spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedखुपटी सरपंचपदाची पोटनिवडणूक रंगात; १२ उमेदवार रिंगणात, २९ एप्रिलला नवा कारभारी

खुपटी सरपंचपदाची पोटनिवडणूक रंगात; १२ उमेदवार रिंगणात, २९ एप्रिलला नवा कारभारी

नेवासा


नेवासे तालुक्यातील राजकीयदृष्ट्या सजग आणि शहरालगत असलेल्या खुपटी गावात सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीने चांगलाच रंग घेतला असून तब्बल १२ उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यास रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


माजी सरपंच दत्तात्रेय वरुडे यांनी ६ सप्टेंबर २०२४ रोजी पदाचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक लागली होती. विशेष म्हणजे स्वतः वरुडे यांनीच पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत उत्सुकता वाढली आहे.


अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सोमनाथ वरुडे, भीमराज कार्ले, दत्तात्रेय वरुडे, संगीता अशोक चौधरी, डिगंबर ससे, रमेश घोरपडे, अमोल गव्हाणे, गोरक्षनाथ तनपुरे, सुनील गव्हाणे, किशोर कुहे, प्रकाश कार्ले आणि नीळकंठ ससे अशा एकूण १२ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.


या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. व्ही. जाधव कार्यरत असून, बुधवारी अर्ज छाननी, १७ एप्रिल रोजी माघार प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून २९ एप्रिल रोजी मतमोजणीनंतर खुपटी गावाला नवा सरपंच अर्थात नवा कारभारी मिळणार आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
40.3 ° C
40.3 °
40.3 °
14 %
4.1kmh
25 %
Mon
39 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

error: Content is protected !!