spot_img
spot_img
Homeअध्यात्मिककिर्तन मालिका ,तमाशा व विशेष नाटकांची लोककला परंपरा जगणारी राज्यातील एकमेव ...

किर्तन मालिका ,तमाशा व विशेष नाटकांची लोककला परंपरा जगणारी राज्यातील एकमेव घोडेश्वरी देवी यात्रा…

श्री घोडेश्वरी देवी यात्रा महोत्सवात पाच दिवस.विविध कार्यक्रमाचे आयोजन.


घोडेगाव ( वार्ताहर) दिलीपराव शिंदे याजकडून

.सोशल मीडियाचा झपाट्याने वाढलेला प्रभाव, चित्रपट-दूरदर्शनची आकर्षणे आणि ओटीटी प्लॅटफॉर्मची नवलाई असतानाही घोडेगावच्या यात्रेतील पारंपरिक सांस्कृतिक वैभव आजही तेवढ्याच दिमाखात जपले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या यात्रेत कीर्तन मालिकेची भक्तीमय परंपरा, तमाशाचा लोककलात्मक रंगतदार ठेका आणि विशेष म्हणजे नाटकांच्या सादरीकरणाची समृद्ध परंपरा अखंडपणे सुरू आहे. आधुनिक माध्यमांच्या गर्दीतही या लोककलेचा दिवा विझू न देता, गावकरी आणि रसिकांच्या सहभागातून ही परंपरा जपली जात असल्यामुळे घोडेगाव यात्रा सांस्कृतिकदृष्ट्या एक वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करते.


मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली असून परिसरात स्वच्छता केली आहे. मिठाई,खेळणी,वदुकासाठी व्यवस्थित जागा उपलब्ध करुन देण्यात आली. प्रसस्थ पार्किंग ,पिण्याचे पाणी दर्शन बारी, देणगी कक्ष ,हरवले-सापडले विभाग,सीसी टी व्हि कॅमेरे ,कुस्त्यांचे मैदान अशी सर्व व्यवस्था करृणयात आली आहे. तरी येणा-या भाविकांनी शांतता भंग होणार नाही याची दक्षता घेऊन सहकार्य करावे असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामस्थांचे वतीने करण्यात आले आहे.


यात्रेत निमित्ताने दिनांक चार मार्च शनिवार पासून नऊ मार्च गुरुवार पर्यंत पुढील प्रमाणे कार्यक्रमाची तयारी केली आहे.
शनीवारी रात्री ह भ प कविराज झावरे यांचे किर्तन वेळ रात्री नऊ वाजता.
रविवारी रात्री ह भ प प्रल्हाद कळमसरे यांचे किर्तन रात्री नऊ वाजता.
सोमवारी रात्री ह भ प निवृत्ती महाराज यांचे किर्तन रात्री नऊ वाजता. होणार आहे


मंगळवारी पहाटे सहा वाजता पवित्र गंगाजल कावड मिरवणूक, श्री घोडेश्वरी देवीस गंगाजल अभिषेक, सकाळी साडे नऊ वाजता देवीस चोळी पातळ,खणा-नारळाने ओटी भरणं कार्यक्रम. रात्री सात वाजता पालखी मिरवणूक (छबिना) .रात्री नऊ वाजता महाआरती, मंदिरा समोर शोभेच्या दारूची आतषबाजी. दहा वाजता आनंद महाजन यांचा तमाशा मोफत दाखविला जाईल.


बुधवारी सकाळी आठ ते अकरा वाजे पर्यंत आनंद महाजन तमाशाची देव हजेरी. रात्री नऊ वाजता पद्मश्री पुरस्कार प्राप्त रघुवीर खेडकर यांचा तमाशा मोफत दाखविला जाईल.


गुरुवारी सकाळी आठ वाजता देणगीदाराचा सन्मान. नऊ वाजता रघुवीर खेडकर तमाशाचा देव हजेरी कार्यक्रम. रात्री नऊ वाजता घोडेश्वरी नाट्य कला अकॅडमी चे माहेरची पाहुणी हे नाट्य मोफत सादर केले जाईल.


बुधवारी दुपारी चार वाजता श्री घोडेश्वरी केसरी कुस्त्यांचे भव्य जंगी हगामा होणार आहे. यात प्रथम कुस्ती साठी ७१०००रु तर ६१००० ,५१००० , ४१०००,३१०००, २१०००, १५०००, ११०००, रुपये असे कुस्त्यांचे ईनाम दिले जातील.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
40.3 ° C
40.3 °
40.3 °
14 %
4.1kmh
25 %
Mon
39 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

error: Content is protected !!