spot_img
spot_img
Homeजीवन मंत्रहळदी-कुंकवाच्या साक्षीने महिलासशक्तीकरणाचा संकल्प

हळदी-कुंकवाच्या साक्षीने महिलासशक्तीकरणाचा संकल्प

नेवाश्यात महायुती महिला आघाडीच्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद




नेवासा :

मकर संक्रांतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून महायुती महिला आघाडीच्या वतीने नगरपंचायतच्या प्रांगणात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास शहर व परिसरातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सौ. रत्नमाला लंघे पाटील उपस्थित होत्या. अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या की, महिलांचे सर्वांगीण सबलीकरण साध्य करण्यासाठी बचत गट हा प्रभावी आधार आहे. महिलांना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि उद्योजकीय दृष्टिकोन मिळावा यासाठी नगरपंचायतच्या माध्यमातून चालू असलेल्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, हीच आमची खरी विकासाची संकल्पना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नगरसेविका डॉ. मनीषा वाघ यांनी संसाराचा गाडा हाकताना महिलांवर येणारा आर्थिक व मानसिक ताण अधोरेखित केला. बचत गटांमुळे महिलांना आधार मिळून ताणतणाव कमी होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी मनोगतात सांगितले की, महिलांशी संबंधित विविध प्रश्नांवर आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व आमदार रत्नमाला लंघे पाटील यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा कायमचा उतरवणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि सन्मानाने जगण्याची संधी देणे हे आमचे ध्येय आहे. बचत गटांच्या माध्यमातून विविध लघुउद्योग उभारून महिलांना रोजगारनिर्मितीची संधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच २६ जानेवारीपासून महिलांसाठी नियमित आरोग्य तपासणी अभियान सुरू करून नेवासा शहरातील ‘सुजय पर्व’ अर्थात विकास पर्वाची खऱ्या अर्थाने सुरुवात होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


यावेळी नगरसेविका शितल डहाळे यांनी मनोगत व्यक्त केले. भाजपा महिला आघाडीच्या भारती बेंद्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी केले.


या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्या सुलभा खंडाळे, नीता कडू, पुष्पा मिरपगार, भारती कर्डक, लता परदेशी, डॉ. रेश्मा लोखंडे, तेजस्विनी लोखंडे, सोनाली म्हस्के, सोनाली पवार, नगरसेविका मेघा सरकाळे, भारती परदेशी, गंगुबाई दारूंटे, साधना नळकांडे, नंदा सोनवणे, डॉ. वैशाली घुले यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
40.3 ° C
40.3 °
40.3 °
14 %
4.1kmh
25 %
Mon
39 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

error: Content is protected !!