spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शुक्रवारी जाहीर सभा; महायुतीकडून ‘गेमचेंजर’ चाल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शुक्रवारी जाहीर सभा; महायुतीकडून ‘गेमचेंजर’ चाल

नेवाशात राजकीय भूकंप! सेनेला अनेकांचा पाठिंबा

 

नेवासा, ता. १७ — नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट! महायुतीच्या प्रचाराला निर्णायक कल देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी दुपारी तीन वाजता थेट नेवाशात जाहीर सभा घेणार आहेत. नगरपंचायत चौक येथे होणाऱ्या या सभेला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती निश्चित असून, ही सभा अंतिम टप्प्यातील ‘टर्निंग पॉइंट’ ठरेल, असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

उद्योजक प्रभाकरराव शिंदे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. करणसिंह घुले आणि सर्व प्रभागांतील महायुतीचे उमेदवार विकासाचा ठोस रोडमॅप मांडत मतदारांपर्यंत पोहोचत असतानाच, शिंदेंची उपस्थिती प्रचाराला नवी धार देणारी ठरणार आहे. दिशा स्पष्ट, विकास ठोस आणि भविष्यासाठी आक्रमक आराखडा—या त्रिसूत्रीवर महायुती उतरल्याने विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
40.3 ° C
40.3 °
40.3 °
14 %
4.1kmh
25 %
Mon
39 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

error: Content is protected !!