spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedजिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; १८० स्पर्धकांचा सहभाग

जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; १८० स्पर्धकांचा सहभाग

नेवासा तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि डी फिटनेस झोनचे अध्यक्ष दत्तात्रय चिंधे यांनी केले यशस्वी आयोजन

नेवासा— महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या संलग्नतेने व अहिल्यानगर असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्सच्या मान्यतेने नेवासा फाटा येथील डी फिटनेस झोनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अहिल्यानगर जिल्ह्यातून सुमारे १८० बॉडी बिल्डरांनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेत नेवासा तालुका श्रीचा किताब ताज बागवान याने पटकावला, तर डी फिटनेस झोन श्रीचा मानकरी अहिल्यानगरचा मोसिन शेख ठरला. संगमनेरचा जय घेगडमल उपविजेता ठरला, तर श्रीरामपूरचा धीरज सोनवणे ‘बेस्ट पोझर’ ठरला.

वजनगटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे :

५६ किलो — मयूर साळवे (नेवासा) प्रथम, अजीम शेख (कोपरगाव) द्वितीय, उत्कर्ष बनसोडे (अहिल्यानगर) तृतीय, श्रीकांत जाधव (कोपरगाव) चतुर्थ, साहिल सय्यद (श्रीरामपूर) पाचवा.

६० किलो — जय घेगडमल (संगमनेर) प्रथम, आकाश बोर्डे (अहिल्यानगर) द्वितीय, प्रथमेश कटके (आश्वी) तृतीय, रविंद्र साळुंखे (कोपरगाव) चतुर्थ, गोविंद छजलाणी (अहिल्यानगर) पाचवा.

६५ किलो — प्रशांत धोत्रे (संगमनेर) प्रथम, सौरभ पडेकर (अहिल्यानगर) द्वितीय, सोनू मनियार (संगमनेर) तृतीय, पवन लोंढे (श्रीरामपूर) चतुर्थ, रितेश साळवे (नेवासा) पाचवा.

७० किलो — मोसिन शेख (अहिल्यानगर) प्रथम, साईदीप जपुरकर (शिर्डी) द्वितीय, जितेंद्र निकम (शिर्डी) तृतीय, साहिल गायकवाड (अहिल्यानगर) चतुर्थ, राहुल गायकवाड (संगमनेर) पाचवा.

७५ किलो — राहुल जगताप (शिर्डी) प्रथम, ताजमोहम्मद बागवान (नेवासा) द्वितीय, यश इंदुरकर (संगमनेर) तृतीय, विकास मेहेत्रे (श्रीरामपूर) चतुर्थ, शुभम आल्हाट (राहुरी) पाचवा.

७५ किलो ओपन गटात सज्जन थोरात (बोटा) प्रथम, महफूज शेख (शिर्डी) द्वितीय, दर्शन काळे (कोपरगाव) तृतीय, दीपक गोरडे (श्रीरामपूर) चतुर्थ, अमित काटे (राहुरी) पाचवा ठरले.

प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात व शिट्यांच्या कडकडाटात प्रत्येक पोझरला दिलेल्या दादेमुळे स्पर्धेतील उत्साह द्विगुणित झाला. पंच म्हणून अहिल्यानगर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष मयूर दरंदले, सचिव कैलास रणसिंग, उपाध्यक्ष सतीश रासकर, प्राचार्य विजय देशमुख, खजिनदार प्रतीक पाटील, राष्ट्रीय पंच सौरभ बल्लाळ यांच्यासह डेव्हिड मकासरे, राहुल कुलकर्णी, मुकुंद कोते, सागर कोळगे, सद्दाम शेख, शुभम चव्हाण यांनी काम पाहिले. स्टेज मार्शल म्हणून अमोल एखंडे, निखिल कोटकर, भीमा चव्हाण व नवनाथ कुहरे यांनी चोख भूमिका बजावली.

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे आयोजक डी फिटनेस झोनचे अध्यक्ष दत्तात्रय चिंधे यांनी उपस्थित मान्यवर, पंच व सहभागी स्पर्धकांचे आभार मानत स्पर्धा यशस्वी झाल्याचे नमूद केले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
40.3 ° C
40.3 °
40.3 °
14 %
4.1kmh
25 %
Mon
39 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

error: Content is protected !!