spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedनेवासा तालुक्यात शेत व शिवरस्ते मोकळे करण्यासाठी ‘मोफत’ पोलीस बंदोबस्त....

नेवासा तालुक्यात शेत व शिवरस्ते मोकळे करण्यासाठी ‘मोफत’ पोलीस बंदोबस्त….

नाथाभाऊ शिंदे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश.. …


नेवासा :
नेवासा तालुक्यात गावनकाशानुसार अस्तित्वात असलेले, मात्र अतिक्रमणामुळे बंद झालेल्या शेतरस्ते, शिवरस्ते व पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी आता शेतकऱ्यांना विनामूल्य (मोफत) पोलीस बंदोबस्त मिळणार आहे. याबाबतचे स्पष्ट आदेश तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी निर्गमित केले असून, महाराष्ट्र राज्य शेत व शिवपांदण रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.


तालुक्यात अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांचे हक्काचे रस्ते बंद झाले असून, ते मोकळे करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. यापूर्वी अशा कारवाईसाठी शेतकऱ्यांना पोलीस बंदोबस्ताचे शुल्क भरावे लागत होते. मात्र शासनाच्या विविध निर्णयांचा (GR) संदर्भ देत तहसीलदारांनी आता शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क न आकारता पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.


या निर्णयानुसार गावनकाशावरील अतिक्रमित रस्ते मोकळे करण्यासाठी भूमी अभिलेख विभागामार्फत हद्दी निश्चित करून लोकसहभागातून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये, ही प्रमुख मागणी घेऊन नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तहसीलदारांच्या या परिपत्रकामुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतीमाल वाहतुकीसह दळणवळण सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


नाथाभाऊ शिंदे पाटील म्हणाले, “शेतकऱ्याला त्याच्याच शेतात जाण्यासाठी रस्त्यासाठी संघर्ष करावा लागणे दुर्दैवी होते. मोफत पोलीस बंदोबस्ताच्या निर्णयामुळे अडलेले शेतरस्ते आता लवकरच खुले होतील.


या निर्णयाचे तालुकाभरातून स्वागत होत असून, प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे शेतरस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेला गती मिळणार आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
33.4 ° C
33.4 °
33.4 °
24 %
2.5kmh
6 %
Mon
33 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

error: Content is protected !!