spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedबालब्रह्मचारी श्री बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांना साई जीवन गौरव पुरस्कार.....

बालब्रह्मचारी श्री बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांना साई जीवन गौरव पुरस्कार…..

नेवासा
शिर्डी साईबाबांच्या पावन भूमीत ओम साई विकास प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय साई जीवन गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सुदाम संसारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर शेठ (कालडा उद्योगपती, संगमनेर), उत्तम काका घोगरे (कृषी तज्ञ), धर्मवीर सहाने सर (वैद्यकीय तज्ञ), डॉ. अरुण गायकवाड (प्राचार्य, संगमनेर कॉलेज) आणि मुकेश ओबेराय (एडीज फार्मा, नाशिक) यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले.


या सोहळ्यात अंमळनेर (ता. नेवासा) येथील हनुमान भक्त, ज्योतिष तज्ञ बालब्रह्मचारी श्री बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांना त्यांच्या धार्मिक कार्याबद्दल राष्ट्रीय साई जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


या पुरस्काराच्या निमित्ताने प्रवरा संगम येथे प्रा. ह.भ.प. देवरे सर यांच्या वस्तीवर श्री पुंजाई माता यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात देवगड संस्थानचे मठाधिपती राष्ट्रीय संत गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज, संस्थानचे उत्तराधिकारी प्रकाश नंदगिरीजी महाराज, त्रिवेणी ईश्वर देवस्थानचे महंत रमेशगिरीजी महाराज तसेच नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळकृष्ण महाराज कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

त्यावेळी उपस्थित भाविकांनी राम कृष्ण हरी आणि किसनगिरी बाबा की जयचा मोठा जय जयकार केला


Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
40.3 ° C
40.3 °
40.3 °
14 %
4.1kmh
25 %
Mon
39 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

error: Content is protected !!