spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गोगलगाव येथे चित्रीकरण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गोगलगाव येथे चित्रीकरण

नेवासा
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेसाठी नेवासा तालुक्यातील गोगलगाव ग्रामपंचायतीने सहभाग घेतलेला आहे. या अभियान अंतर्गत मुख्य घटकांवर झालेल्या कामाचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यस्तरीय चित्रीकरण नेवासा तालुक्याचे गटविकास अधिकारी संजय लखवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार यांच्या उपस्थितीत गोगलगाव येथील चित्रीकरण नुकतेच संपन्न झाले.


जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात , “धन्य तोचि ग्राम जेथे हरीचे दासl धन्य तोची वंश भक्तीभाग्य ll”
या वचनाप्रमाणे ज्या गावात हरीचे दास , हरीचे भक्त राहतात ते गाव धन्य असते आणि ज्या वंशामध्ये हरीचे भक्त जन्माला आले तो वंश सुद्धा भाग्यवान असतो. श्री दत्त देवस्थान , श्रीक्षेत्र देवगड तालुका नेवासा येथील उत्तराधिकारी ह. भ. प. स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज यांचे गोगलगाव हे जन्मगाव आहे.


या गावात महाराष्ट्र शासनाकडील मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची दिनांक 17 सप्टेंबर 2025 पासून तयारी करण्यास सुरुवात झाली. ग्रामपंचायतीचे प्रशासक गोविंदराव मते व ग्रामपंचायत अधिकारी बापूसाहेब राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. या अभियानातील मुख्य सात घटकांवर लक्ष केंद्रित करून ग्रामपंचायतीने विविध उपक्रमाची यशस्वी सुरुवात केलेली आहे. यात प्रामुख्याने सुशासन युक्त गाव , गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण , लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे , जलसमृद्ध , स्वच्छ व हरित गाव , मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण , सक्षम पंचायत , उपजीविका विकास व सामाजिक न्याय तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत स्त्री जन्माचे स्वागत करूया व मियावाकी वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. या अभियान कालावधीमध्ये यापुढेही ग्रामपंचायत पातळीवर असेच कामकाज सातत्यपूर्ण सुरू ठेवावे , असे आवाहन याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले.


आज ग्रामपंचायतीने अभियान काळात केलेल्या सर्व कामांचे चित्रीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून नेमलेल्या टीमकडून करण्यात आले. याप्रसंगी गोगलगाव येथील ग्रामस्थ , महिला बचत गटाच्या माता भगिनी यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला. या सर्व कामाबाबत नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार यांच्या उपस्थितीत महिला बचत गटांच्या सदस्यांनी सुरू केलेल्या व्यवसायास भेटी देण्यात आल्या. तसेच यावेळी महिलांची सभा , आरोग्य तपासणी शिबिर , स्वच्छता अभियान , सुदामराव मते पाटील माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यात आले.


याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व कर्मचारी , सुदामराव मते पाटील माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी , उमेद कर्मचारी, आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका व मदतनीस , आशा कार्यकर्ती, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी , महिला बचत गटाच्या सदस्य आणि गावातील ग्रामस्थ व भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
40.3 ° C
40.3 °
40.3 °
14 %
4.1kmh
25 %
Mon
39 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

error: Content is protected !!