spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedसमता नागरी सहकारी पतसंस्था मर्या.कोपरगाव यांच्या २७ व्या नेवासा शाखेच्या नव्या अत्याधुनिक...

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या.कोपरगाव यांच्या २७ व्या नेवासा शाखेच्या नव्या अत्याधुनिक कार्यालयाचे उद्घाटन…


नेवासा (प्रतिनिधी) – ४० वर्षांची परंपरा आणि एक लाखांपेक्षा अधिक सभासदांचा विश्वास लाभलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कोपरगाव यांच्या २७ व्या नेवासा शाखेच्या नव्या अत्याधुनिक कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवार दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता औदुंबर चौक, कुंभकर्ण बिल्डिंग, वर्धमान ट्रेडर्स समोर, नेवासा येथे होणार आहे.


या कार्यालयाचे उद्घाटन अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मा. चंद्रशेखरजी घुले पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पांडुरंगजी अभंग राहणार आहेत.


या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा (काका) कोयटे, उपाध्यक्ष अरविंद दामोदर पटेल, संचालक दिपक गुलाबचंद अग्रवाल, सौ. श्वेता भरत अजमेरा, जितेंद्र कांतीलाल शहा, निरव कान्हाभाई रावलिया, गिरीष जगन्नाथ सोनेकर, संदीप ओमप्रकाश कोयटे, सौ. अक्षरा अनुप पटेल, सरव्यवस्थापक सचिन शंकरलाल भट्टड तसेच शाखाधिकारी अमोल दिवटे यांच्यासह कर्मचारीवृंद उपस्थित राहणार आहेत.


उद्घाटनानिमित्त सायंकाळी ५ ते ७ या वेळेत अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली असून या कार्यक्रमास सभासद, हितचिंतक व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
33.4 ° C
33.4 °
33.4 °
24 %
2.5kmh
6 %
Mon
33 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

error: Content is protected !!