नेवासा(प्रतिनिधी)हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा ईशारा नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील यांनी दिला आहे.
या वर्षांपासून केंद्र सरकारने गव्हाचा हमीभाव २ हजार ५८५ रुपये प्रतिक्विंटल आणि हरभऱ्याचा भाव ५ हजार ८७५ रुपये प्रतिक्विंटल असा दर जाहीर केला आहे असे असतांना मात्र काही व्यापारी आवक जास्त आहे, मालाची प्रत खराब आहे अशी कारणे सांगून गहू अवघ्या १८०० ते २२०० रुपये भावाने खरेदी करत आहेत.अनेक संकटाला तोंड देऊन शेतकरी आपला शेत माल पिकवीत आहे
काही व्यापाऱ्यांकडून हरभऱ्याचे भाव देखील पाडले जात असल्याच्या तक्रारी शेतकरी बांधवांनी आमच्याकडे केलेल्या आहेत वास्तविक हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतमाल खरेदी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मुळातच हमीभाव काढताना केंद्र शासनाने चुकीच्या पद्धतीने उत्पादन खर्च धरलेला आहे.
विद्यापीठाने आणि राज्य सरकारने केंद्राला कळविलेला उत्पादन खर्च आणि केंद्र सरकारकडून दिला जाणारा हमीभाव यामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे.उत्पादन खर्चच कमी दाखविला गेल्याने साहजिकच हमीभाव देखील पाडला जात असून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा शेती माल हा सरकारी हमीभावाने खरेदी करावा,जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हातभार लागू शकेल. जर हमीभावापेक्षा कमी भावाने शेतीमाल खरेदी होत असल्यास किंवा करीत असल्यास नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत कडक कारवाई करण्यात येईल असा ईशारा देऊन शेतकऱ्यांना योग्य भाव देऊन व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, हमीभावापेक्षा कमी भावात शेतकऱ्यांनी शेतमाल विकू नये असे आवाहन सभापती नंदकुमार पाटील यांनी केले आहे
हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार-नंदकुमार पाटील
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
40.3
°
C
40.3
°
40.3
°
14 %
4.1kmh
25 %
Mon
39
°
Tue
41
°
Wed
42
°
Thu
42
°
Fri
43
°

