महिला सरपंचाच्या कारभारात लुडबुड करणाऱ्या पतीवर आणि तेथील ग्रामसेवकावर कारवाई करावी
शेवगाव, दि.४ (प्रतिनिधी आबा लांडे सर
महिला सक्षमीकरणाच्या उदात्त हेतूने घटनेत बदल करून. महिलासाठी आरक्षण लागू करण्यात आले आहे . स्थानिक स्वराज्य संस्थात तब्बल५० टक्के आरक्षणाचा कायदा झाला . शेवगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील आरक्षणामुळे निवडून आलेल्या बहुतेक महिला पदाधिकारी कोणत्याही काम काजात भाग घेत नाही . त्यांच्या ऐवजी पदाधिकारी महिलांचे पती स्वतःच पदाधिकाऱ्यांच्या अविर्भावात सर्व कामकाज पहातात . मासिक बैठका सह अन्य बैठकीत निर्णय घेऊन कायद्याची पायमल्ली करतात, हे वास्तव आहे
या संदर्भात येथील वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल व युवक तालुका अध्यक्ष ऑगस्टिन गजभिव यांनी आज बुधवारी (दि.४ ) गटविकास अधिकारी सोनल शहा यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सविस्तर निवेदन देऊन ही कार्यपद्धती सुधारण्यासंदर्भात विनंती केली आहे . तसेच प्रसंगी उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .
या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील ९४ ग्रामपंचायती पैकी ४७ ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच पदाधिकारी आहेत . मात्र बहुतेक ग्रामपंचायतीमध्ये त्यांचे पतीच उपस्थित राहून मनमानी कारभार करतात . घरकुलासाठी पैशाची मागणी करतात. तसेच शासनाच्या जागा परस्पर कोणताही अधिकार नसताना बोगस कागदपत्रे तयार करून विकतात अशा अनेक तक्रारी वंचित आघाडीकडे आलेल्या आहेत .यापुढील कोणत्याही मासिक बैठकीमध्ये गावाच्या महिला सरपंचांनी उपस्थित राहणे आवश्यक करावे . ज्या ग्रामपंचायतीच्या सरपंच महिला आहेत तिथे त्यांचे पती कामकाज पहात असतील तर तिथल्या ग्रामसेवकावर कारवाई करावी व असे “झेरॉक्स सरपंच “आहेत त्यांना ताबडतोब आवर घालावा ते कायद्याची पायमल्ली करत यानिर्णयाच्या उदात हेतूलाच काळीमा फासत आहेत . तरी असे आढळल्यास वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कुठलीही पूर्व सूचना न देता आपल्या जालनासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल . असे नमुद करण्यात आली आहे .
निवेदनावर तालुका अध्यक्ष प्यारेलाल ,युवा अध्यक्ष ऑगस्टिन गजभिव, यांचे सह शेख सलीम,लूकास गजभिव, अविनाश गजभिव,राहुल गजभिव आदींच्या सह्या आहेत .

