spot_img
spot_img
Homeअध्यात्मिकमोहिनीराज यात्रा महोत्सव आपल्या शहराचा पारंपरिक ऐतिहासिक ठेवा व मानबिंदू ठरेल असा...

मोहिनीराज यात्रा महोत्सव आपल्या शहराचा पारंपरिक ऐतिहासिक ठेवा व मानबिंदू ठरेल असा उत्साही सहभाग सर्व नागरिकांनी घ्यावा – आमदार विठ्ठलराव लंघे

21 जानेवारी ते 10 फेब्रुवारी होणार मोहिनीराजाची यात्रा शांतता कमिटी बैठकीत केले आवाहन

नेवासा

नेवासा शहराचा मानबिंदू असलेला ऐतिहासिक व पारंपरिक मोहिनीराज यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले.

 नेवासा हे विष्णूच्या मोहिनी अवताराचे एकमेव मंदिर असलेले गाव असून, ग्रामदैवत मोहिनीराजांची पंधरा दिवसांची यात्रा २१ जानेवारीपासून रथ सप्तमीपासून सुरू होत आहे.

या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रथमच शासकीय पातळीवर पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी योग्य आयोजन केल्याने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार विठ्ठलराव लंघे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, यात्रा समिती ज्येष्ठ कार्यकर्ते संजय सुखदान, तहसीलदार संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यात्रा काळात सामाजिक शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवावा, नगरपालिकेने पालखी मार्गासह शहरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, तसेच महावितरणने वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. शहरातील सर्व ७२ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवावेत, भाविकांसाठी मोबाईल शौचालयांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, मंदिर परिसरात व गर्दीच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवावा, तात्पुरती पोलीस चौकी उभारावी, झेंडा मिरवणूक सायंकाळी सात वाजेपर्यंत संपवावी आणि मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर टाळावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

या सर्व सूचनांची सकारात्मक दखल घेत अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन देतानाच, सर्व खात्यांच्या प्रशासनाने या सूचनांनुसार यात्रा काळात सतर्क राहावे असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी केले.

पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पडावी यासाठी सर्वतोपरी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, असे सांगून भाविकांनी गर्दी नियंत्रण व मिरवणूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.,

चर्चेदरम्यान सामाजिक कार्यकर्ते संजय सुखदान, संतोष गव्हाणे, देवस्थान समितीचे विश्वस्त जयेश बडवे जया काका देवचक्क उदय कुमार बल्लाळ अमित देवचक्के डॉक्टर प्रणव जोशी महेश मापारी स्वप्निल मापारी शिवा राजगिरे, निरंजन डहाळे संभाजी,धोत्रे, अनिल शिंदे, जयदीप जामदार, रमेश शिंदे आणि गुरुप्रसाद देशपांडे आधी समिती सदस्यांनी यांनी मौल्यवान सूचना मांडल्या.

दरम्यान, शांतता समिती व प्रशासनातर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
35.8 ° C
35.8 °
35.8 °
20 %
0.4kmh
35 %
Mon
35 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

error: Content is protected !!