spot_img
spot_img
Homeअध्यात्मिकसाधू संतांचे विचार हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा… महंत भास्करगिरी महाराज

साधू संतांचे विचार हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा… महंत भास्करगिरी महाराज

डॉक्टर सुभाष शेकडे लिखित संत चारीधाम ग्रंथाचे श्रीक्षेत्र देवगड येथे प्रकाशन…!!


नेवासा प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील भूलोकीतील स्वर्ग असलेले दत्तपीठ श्री क्षेत्र देवगड संस्थान येथे संत चारधाम संत चरित्र ग्रंथ प्रोफेसर डॉ.सुभाष शेकडे लिखित ग्रंथांचे प्रकाशन देवगड संस्थान चे मठाधिपती महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडले. साधु – संताचे विचार हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य असा ठेवा आहे. – ह. भ. प. भास्करगिरी महाराज. यांनी बोलताना सांगितले.


संतांचे अध्यात्मिक विचार हे ईश्वरभक्ती , प्रेम, समानता आणि मानवतेवर आधारित आहेत. संत भगवान बाबा , संत वामनभाऊ यांनी अध्यात्माद्वारे सर्वांमध्ये परमेश्वर पाहणे, मानवी सेवा करणे, अज्ञानांना सज्ञान बनवणे व बहुजनांना अध्यात्माच्या मार्गाने घेऊन जाण्यातच खरा परमार्थ मानला. ज्ञानोबा – तुकोबांच्या लेखणीतून आणि विचारातून उतरलेला भक्तिमार्ग संत चारधाम या चरित्र ग्रंथातील सर्व संतांनी सर्वसामान्यांसाठी सोपा करून दिला.

संतांनी अंधश्रद्धेच्या विचारांना फाटा देऊन सर्वांना बरोबर घेऊन अध्यात्म रंगात रंगवून सर्वसामान्यांना समतेचा संदेश दिला. भाऊ – बाबांचे कार्य हे संत किसनगिरी बाबांच्या कार्याशी सुसंगत असे होते. त्यांचे एकमेकांशी अतूट असे आध्यात्मिक नाते होते. संत चारधाम या चरित्र ग्रंथातील संत भगवान बाबा, संत वामनभाऊ, संत नारायण महाराज, संत खंडोजी बाबा या चारही संतांच्या चरित्र वाचनाने चारधाम घडल्याचे पुण्य वाचकाच्या पदरात पडेल. असा संदेश ह. भ. प. भास्करगिरी महाराज यांनीदिला

संतचारधाम या प्रोफेसर डॉ. सुभाष शेकडे लिखीत संतचरित्र ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी श्रीक्षेत्र देवगड येथे मांडले. याप्रसंगी ह. भ. प. स्वामी प्रकाशानंदजी महाराज, ह.भ. प. कल्याण महाराज पवार , अण्णासाहेब सदाफळ,प्रा. डॉ.राजकुमार घुले, प्रोफेसर डॉ.सुभाष शेकडे , प्रा. डॉ. सुमित्रा घुले, देवगडचे सरपंच अजय साबळे,मेजर सतीश बडे आदिनाथ पटारे तसेच इतर भाविक भक्तगण मोठ्या संखेने उपस्थित होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.राजकुमार घुले यांनी केले. आभार प्रदर्शन लेखक प्रोफेसर डॉ.सुभाष शेकडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुमित्रा घुले यांनी केले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
33.4 ° C
33.4 °
33.4 °
24 %
2.5kmh
6 %
Mon
33 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

error: Content is protected !!