spot_img
spot_img
Homeअध्यात्मिकग्रामदैवत मोहिनीराज मंदिरात'पसायदानाची' आकर्षक प्रतिमा मंदिरात स्थापित करून मराठी भाषेच्या वैभवाला अभिवादन....

ग्रामदैवत मोहिनीराज मंदिरात’पसायदानाची’ आकर्षक प्रतिमा मंदिरात स्थापित करून मराठी भाषेच्या वैभवाला अभिवादन….

मोहिनीराजा बरोबरच करणार संत ज्ञानेश्वरांचे व ज्ञानेश्वरी ग्रंथसह पसायदानाचे दर्शन

नेवासा

: मराठी भाषा दिन हा राज्यभर साजरा होतो; मात्र त्याला नेवासात विशेष ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अधोरेखित महत्त्व लाभते. कारण याच पावन भूमीत संत ज्ञानेश्वर यांनी मराठीतील पहिला महान ग्रंथ असलेली ज्ञानेश्वरी रचून मराठी भाषेला अमृतमय तेज प्राप्त करून दिले. या ऐतिहासिक परंपरेची जाणीव ठेवत मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिर येथे ‘पसायदान’ प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.


संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या अखेरीस मागितलेल‘पसायदान’ हे मराठी साहित्यविश्वातील सार्वकालिक प्रार्थनागीत मानले जाते. त्या पसायदानाची आकर्षक प्रतिमा मंदिरात स्थापित करून मराठी भाषेच्या वैभवाला अभिवादन करण्यात आले. या प्रतिमेचे अनावरण व दगडी व्यासपीठावर स्थापित करण्यात आलेल्या माऊलींच्या प्रतिमेसह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पूजन संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त वेदांताचार्य हभप देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री यांच्या हस्ते संपन्न झाले.


यात्रोत्सव काळात उभारण्यात आलेल्या दगडी व्यासपीठावर यापूर्वी भागवत संहिता सांगितली जात होती; मात्र इतर दिवशी त्याचा मर्यादित उपयोग होत होता. मराठी भाषा दिन आणि एकादशीचे औचित्य साधून याच व्यासपीठावर माऊलींची प्रतिमा व ज्ञानेश्वरी दर्शनासाठी कायमस्वरूपी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नेवासाच्या कर्मभूमीची ओळख येथे येणाऱ्या भाविकांना अधिक ठळकपणे होणार आहे. व ज्ञानेश्वर दर्शनाचा लाभ होणार आहे


या प्रसंगी श्री मोहिनीराज मंदिर देवस्थानचे सचिव जयेश बडवे व उपाध्यक्ष शंकरराव बडवे यांनी हभप देविदासजी महाराज यांचे संतपूजन करून सत्कार केला केले,

तर धार्मिक विधींचे पौरोहित्य नारायण काका बडवे यांनी केले संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे सेवेकरी आदिनाथ महाराज पांगरे, दामोदर पवार आदी भाविक उपस्थित होते.

पसायदानाच्या या सुंदर कलाकृतीची निर्मिती नेवासा येथील कलावंत व शिवम रेडियम चे अंकुश शिंदे यांनी केली आहे


मराठीचा पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी नेवासात लिहिला गेला, ही ऐतिहासिक वस्तुस्थिती लक्षात घेता मराठी भाषा दिनाचा उत्सव येथे केवळ औपचारिक राहत नाही, तर तो भाषाभिमान, सांस्कृतिक स्मरण आणि आध्यात्मिक परंपरेचा जागर यांचा संगम ठरतो. पसायदान प्रतिमेच्या अनावरणामुळे या परंपरेला नव्या रूपात अभिवादन करण्यात आले आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
40.3 ° C
40.3 °
40.3 °
14 %
4.1kmh
25 %
Mon
39 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

error: Content is protected !!