spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedरेणुका प्रकटदिनी पवित्र नद्यांचे गंगाजल कावडीने आणून घोडेश्वरी देवीस अभिषेक

रेणुका प्रकटदिनी पवित्र नद्यांचे गंगाजल कावडीने आणून घोडेश्वरी देवीस अभिषेक

गावात आई राजाचा उदो करीत कावडधारकांचे जंगी स्वागत

ढोल ताशांनी घोडेगाव दुमदुमले


दिलीप शिंदे, घोडेगाव

प्रयागराज, काशी, गाणगापूर आणि उज्जैन अशा चार ठिकाणचे आणले गंगाजल


घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी देवीच्या सहा दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवातील मंगळवार हा मुख्य दिवस ठरला. यात्रेच्या निमित्ताने सुमारे पन्नास भाविकांनी प्रयागराज, काशी, गाणगापूर आणि उज्जैन येथून पवित्र गंगाजल कावडीने आणून देवीस अभिषेकासाठी अर्पण केले. या पवित्र कावड यात्रेमुळे गावात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कावडधारकांचे घोडेगावच्या भूमीत आगमन होताच ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषांच्या वातावरणात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. “गंगा भैय्या की जय, घोडेश्वरी माता की जय, आईराजा उदे उदे” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कावडधारकांची मुक्कामाची व्यवस्था श्रीनाथ मंगल कार्यालय येथे करण्यात आली होती. यावेळी प्रकाश शिदोरे आणि रविंद्र शिदोरे या बंधूंनी कावडधारकांसाठी भोजन, प्रसाद व पाण्याची व्यवस्था केली. विशेष म्हणजे राज्याबाहेरील पवित्र गंगाजल कावड यात्रेचे हे आठवे वर्ष आहे.
प्रयागराज, काशी, गाणगापूर आणि उज्जैन अशा चार ठिकाणी वेगवेगळे भाविकांचे गट गंगाजल आणण्यासाठी गेले होते. या कावड यात्रेत दामोदर जाधव, रमेश जाधव, शिवाजी ईखे, कल्याण ईखे, विष्णू दातीर, आसिफ पठाण (गुड्डू भाई), दिलीप लोखंडे, बबन शिदोरे, गोरख लोखंडे, दत्तात्रय कदम, राजाराम सोनवणे, गोटू कुत्तरवाडे, उल्हास बऱ्हाटे, नबाजी सोनवणे, नारायण चौधरी, दिलीप मोहिते, सोपान माळी, शरद दारकुंडे आदींसह अनेक भाविक सहभागी झाले होते.
मंगळवारी पहाटे सहा वाजता मंत्रोच्चाराच्या वातावरणात श्री घोडेश्वरी देवीस पवित्र गंगाजलाने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता देवीस साडी-चोळी अर्पण करून नारळाची ओटी भरत यात्रेच्या मुख्य सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
40.3 ° C
40.3 °
40.3 °
14 %
4.1kmh
25 %
Mon
39 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

error: Content is protected !!