नेवासा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रतापभाऊ चिंधे यांची भारतीय जनता पार्टीच्या नेवासा विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल नेवासा फाटा येथे आयोजित एका छोटेखानी समारंभात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी चिंधे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोलभाऊ दिघे, तालुका अध्यक्ष सागर पुंड, सरचिटणीस प्रवीण मोरे, तसेच ज्ञानदेव झिंजुर्डे, ज्ञानेश्वर आठरे, रवींद्र शेळके, दत्तात्रेय सुमोसे, ऋषिकेश म्हस्के, विशाल काळे, योगेश शेळके, बाबासाहेब टिळेकर, मानव साळवे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

