नेवासा:
हंडीनिमगाव येथे बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला
सदर अपघाताची माहिती मिळताच विकास निपुंगे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अपघातात माळीचिंचोरा येथील मारीयाबाई फिलीप वाघमारे व फिलीप दाविद वाघमारे हे दोघे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले असल्याचे आढळून आले. परिसरातील नागरिकांनीही तातडीने मदतीसाठी धाव घेतली.
नागरिकांच्या सहकार्याने दोन्ही जखमींना तात्काळ नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्वरित तपासणी करून आवश्यक उपचार करण्याचा प्रयत्न केला; मात्र दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी दोन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आले असून पोलिसांकडून अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.

