spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedवेदिका मुथ्था नॅशनल स्कॉलरशिप परीक्षेत नेवासा तालुक्यात प्रथम

वेदिका मुथ्था नॅशनल स्कॉलरशिप परीक्षेत नेवासा तालुक्यात प्रथम


नेवासा फाटा :

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा भानसहिवरे (ता. नेवासा) येथील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी वेदिका निलेशकुमार मुथ्था हिने नॅशनल स्कॉलरशिप परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात नववा, जिल्ह्यात दुसरा आणि नेवासा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून शाळा व तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.


वेदिका हिने लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षा तसेच मंथन सामान्य ज्ञान परीक्षा यामध्येही उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश मिळवले आहे. तिच्या या सातत्यपूर्ण यशामुळे शाळेतील शिक्षकांसह परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.


या यशामागे गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर, केंद्रप्रमुख रवींद्र कडू पाटील, मुख्याध्यापक राजेश जगताप, वर्गशिक्षक अशोक ढोले यांचे मार्गदर्शन तसेच पालकांचे प्रोत्साहन लाभले. वेदिकाच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक व ग्रामस्थांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
scattered clouds
40.3 ° C
40.3 °
40.3 °
14 %
4.1kmh
25 %
Mon
39 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

error: Content is protected !!