spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorized‘बॅट–झाडू’च्या एकजुटीने परिवर्तनाचा हुंकार; नंदकुमार पाटील यांच्या प्रचारार्थ ऐतिहासिक रॅली

‘बॅट–झाडू’च्या एकजुटीने परिवर्तनाचा हुंकार; नंदकुमार पाटील यांच्या प्रचारार्थ ऐतिहासिक रॅली

नेवासा

नगरपंचायत निवडणूक २०२५ मध्ये सत्ताधारी राजकारणाला थेट आव्हान देत क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरले आहेत. नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार पाटील नंदकुमार लक्ष्मणराव आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या तसेच आम आदमी पार्टीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवार, दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता मळगंगा देवी मंदिर, नेवासा येथून जनतेचा संताप, शेतकऱ्यांचा आक्रोश आणि युवकांचा रोष व्यक्त करणारी भव्य प्रचार रॅली निघणार आहे.

या रॅलीस माजी पंचायत समिती सभापती सौ. सुनीताताई शंकरराव गडाख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, भ्रष्ट कारभार, अपयशी नेतृत्व आणि विकासाच्या खोट्या आश्वासनांविरोधात नेवाशाचा निर्णायक लढा छेडला जाणार आहे.
‘बॅट’ आणि ‘झाडू’ ही केवळ चिन्हे नसून सत्तेची मक्तेदारी मोडून काढणारी हत्यारे आहेत, असा स्पष्ट संदेश या रॅलीतून दिला जाणार आहे.

सत्तेच्या खुर्च्या हलवणाऱ्या या शक्तिप्रदर्शनात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मा. आ. शंकरराव गडाख पाटील मित्र मंडळ, नेवासा यांनी केले आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!