यंदा वर्षभर राज्यात कार्यक्रम सुरु राहतील हा अखिल भारतीय मराठा महासंघाचा देशव्यापी उपक्रम असेल
अखिल भारतीय मराठा महासंघाचा देशव्यापी उपक्रम
नेवासा
आग्रा (उत्तरप्रदेश) : आग्रा येथील ऐतिहासिक किल्ल्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांची सुटका झाल्याच्या ऐतिहासिक घटनेला ३६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सोमवारी (दि. १७ ऑगस्ट) आग्रा किल्ल्यासमोर ‘शिवछत्रपतींचा जागर’ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. दरवर्षी हा उपक्रम साजरा करण्यात येईल अशी घोषणा राष्ट्रीय सचिव संभाजीराव दहातोंडे यांनी केली
यावेळी आग्र्याचे खासदार राजकुमार चाहार, महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप, प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील, उपाध्यक्ष संतोष नानावटे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत पुतळ्यावर फुलांची उधळण करण्यात आली. उपस्थितांनी शिवरायांच्या शौर्याचा आणि स्वराज्य स्थापनेच्या महान कार्याचा गौरव केला. आग्रा येथील ऐतिहासिक प्रसंग हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
यावेळी बोलताना संभाजी दहातोंडे पाटील म्हणाले, १७ आॅगस्ट हा जगाच्या इतिहासातील चतुर्याचा दिवस आहे. अर्ध्या जगाचा बादशहांच्या कैदेतून आणि तेही आग्र्या सारख्या भक्कम तटबंदी आणि वाराही आत शिरु शकत नाही अशा किल्ल्यातून सुटका होणे सोपी गोष्ट नाही. हा दिवस आणि हा इतिहास चातुर्यांचा आहे. मराठा महासंघाकडून या निमित्त १७ आॅगस्ट हा एतिहासीक दिवस सर्वासाठी महत्वाचा आहे. या इतिहासातील पाऊलखुना जपल्या पाहीजेत. त्याचे नव्या पिढीला स्मरण, आणि जाणीव झाली पाहिजे. त्यामुळे यंदापासून अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे समाजीक जागृतीसाठी दरवर्षी यापुढे या दिवशी जागर शिवछत्रपतीचा हा उपक्रम सुरु करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची जनजागृती केली जात आहे. आजच्या कार्यक्रमासह वर्षभर महाराष्ट्रात कार्यक्रम सुर राहणार असल्याचे दहातोंडे पाटील म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वराज्याच्या विचारांची आणि त्यांच्या प्रेरणादायी कार्याची नव्या पिढीला माहिती व्हावी, या उद्देशाने ‘शिवछत्रपतींचा जागर’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास, विचार आणि स्वराज्याची प्रेरणा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला. या ऐतिहासिक उपक्रमामुळे आग्रा येथे उपस्थित शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. असल्याचे राष्ट्रीय सचिव संभाजी राजे दहातोंडे यांनी सांगितले
आग्र्याचे खासदार राजकुमार चाहार, प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय सरचीटणीस संभाजी दहातोंडे पाटील. महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप, प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय सरचीटणीस संभाजी दहातोंडे पाटील. उपाध्यक्ष संतोष नानावटे, दिलीप धंदरे, मुंबई विभागाचे अध्यक्ष अविनाश राणे, संयुक्त चिटणीस राजेश घाणेकर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष महेश सावंत, कोषाध्यक्ष अनंत मोरे, मंगेश शिर्के, मयुर गुजर, धोंडु जाधव, नागपुरच्या वंदना होटकर, उदयसिंह पाटील, किशोर घाग, अहिल्यानगरचे शामराव पवार, रावसाहेब मरकड, शारदा गवांदे, जयसिंग मोरे यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
फुलांची उधळण, शिवजयजयकार
आग्र्याच्या किल्ल्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांची सुटका झाल्याच्या घटनेला ३६० वर्ष पुर्ण झाले असल्याने मराठा महासंघातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आग्र्याचे खासदार राजकुमार चाहार, प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय सरचीटणीस संभाजी दहातोंडे पाटील. महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप, संतोश नानावटे, अविनाश राणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी फुलांची उधळण करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार केला. किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर फुलांची उधळण करण्यात आली.

