spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedन्यायालयाच्या आदेशाने शनैश्वर देवस्थानचा कारभार पुन्हा विश्वस्तांकडे

न्यायालयाच्या आदेशाने शनैश्वर देवस्थानचा कारभार पुन्हा विश्वस्तांकडे

डिसेंबरअखेर मुदत संपणार

शनिशिंगणापूर, दि. १८ — श्री शनैश्वर देवस्थानच्या कारभारावरून सुरू असलेल्या वादाला अखेर न्यायालयीन शिक्कामोर्तब मिळाले असून औरंगाबाद खंडपीठाच्या स्पष्ट आदेशानंतर देवस्थानचा पदभार पुन्हा जुन्या विश्वस्त मंडळाकडे सोपवण्यात आला. उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी अध्यक्ष भागवत बानकर व विश्वस्तांच्या ताब्यात देवस्थानचे सर्व प्रशासकीय व आर्थिक अधिकार सुपूर्द केल्याचे अधिकृत पत्र दिले.

प्रशासकीय समितीकडील कामकाजाचा संपूर्ण ताबा विश्वस्त मंडळाकडे देताना देवस्थानच्या बँक खात्यांचा जमा–खर्च तपशील, सुमारे १५० फाईल्स आणि बँक व्यवहारांचे अधिकारही हस्तांतरित करण्यात आले. या प्रक्रियेमुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय अनिश्चिततेला पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे.

राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने २२ सप्टेंबर रोजी विश्वस्त मंडळ बरखास्त करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली होती. त्यानंतर देवस्थानचे कार्यालय सील करून उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय प्रशासकीय समितीमार्फत कारभार चालवण्यात येत होता. मात्र या निर्णयाविरोधात जुन्या विश्वस्त मंडळाने खंडपीठात दाद मागितली होती.

संपूर्ण सुनावणीनंतर १२ डिसेंबर रोजी औरंगाबाद खंडपीठाने प्रशासक नेमणुकीचा शासन निर्णय रद्द करत सात दिवसांच्या आत कारभार जुन्या विश्वस्त मंडळाकडे देण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या निर्देशानुसार नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती होईपर्यंत देवस्थानचा कारभार आणि बँक व्यवहार जुनेच विश्वस्त पाहणार आहे

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
32.2 ° C
32.2 °
32.2 °
43 %
5.9kmh
2 %
Fri
31 °
Sat
40 °
Sun
40 °
Mon
40 °
Tue
37 °

Most Popular

error: Content is protected !!