spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedकृषी ज्ञानपरंपरेला नवे नेतृत्व---डॉ. विलासराव खर्चे यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी...

कृषी ज्ञानपरंपरेला नवे नेतृत्व—डॉ. विलासराव खर्चे यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती…..

नेवासा( विशेष प्रतिनिधी)

:महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार दत्तात्रय भरणे समवेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलासराव खर्चे सर


महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती आदरणीय आचार्य देवव्रत यांनी डॉ. विलासराव खर्चे यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या कुलगुरूपदी नियुक्ती करून कृषी शिक्षण व संशोधन क्षेत्राला दूरदृष्टीचे नेतृत्व बहाल केले आहे. मृदशास्त्रातील प्रावीण्य, उच्च दर्जाची शैक्षणिक गुणवत्ता, कृषी संशोधनातील मोलाचे योगदान तसेच शेतकऱ्यांच्या जीवनाशी थेट नाते जोडणारे विस्तार कार्य या सर्व गुणांच्या बळावर ही निवड करण्यात आली आहे.


१९६८ मध्ये स्थापनेपासूनच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनाच्या जोरावर अलौकिक ख्याती संपादन केली आहे. १९६९ पासून कृषी संशोधन, शिक्षण व विस्तार या त्रिसूत्रीवर आधारित कार्याचा भक्कम पाया घातला गेला. या विद्यापीठातून घडलेले शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी व प्राध्यापक आज देशभर कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.


कार्यकालाच्या प्रारंभापासून विद्यापीठाला दूरदृष्टी असलेले, जागतिक कीर्तीचे कुलगुरू लाभले. स्वर्गीय डॉ. एम. एस. पवार यांनी घातलेला भक्कम पाया, त्यानंतर डॉ. सुभाष पुरी व राजाराम देशमुख यांनी दिलेले उंच शिखर यामुळे विद्यापीठाची ओळख अधिक समृद्ध झाली. काही काळ टीकेला सामोरे जावे लागले असले, तरी उत्कृष्ट संशोधन, शैक्षणिक गुणवत्ता आणि ठोस कार्यातून विद्यापीठाने आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली. तृणधान्ये, कडधान्ये, फळे, भाजीपाला व पशुपालन क्षेत्रातील संशोधित नवीन जातींमुळे विद्यापीठाने भारतीय पातळीवर अग्रस्थान मिळवले असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ घडवून आणली आहे.


कुलगुरू नियुक्तीसाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सर्च कमिटीसमोर २७ नामवंत शास्त्रज्ञांचे प्रस्ताव सादर झाले. त्यापैकी १२ जणांच्या मुलाखती घेऊन पाच शास्त्रज्ञांची शिफारस करण्यात आली. महामहिम राज्यपालांनी या पाचही शास्त्रज्ञांशी सखोल संवाद साधल्यानंतर डॉ. विलासराव खर्चे यांची निवड केली.


प्राध्यापक, संशोधक आणि संशोधन संचालक म्हणून केलेल्या प्रदीर्घ सेवेमुळे डॉ. खर्चे यांच्याकडे स्पष्ट दृष्टी, प्रशासकीय अनुभव आणि संशोधनाला दिशा देण्याची क्षमता आहे. स्वच्छ, पारदर्शक आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यशैली त्यांना संवेदनशील व सक्षम प्रशासक ठरवते. विद्यार्थ्यांना घडविण्याची त्यांची नितांत आवड कृषी शिक्षणाला नवी उंची देणारी ठरेल.
शेतात अहोरात्र परिश्रम करणारे संशोधन सहाय्यक, मजूर आणि गोरगरिबांविषयी त्यांची असलेली कळकळ विद्यापीठाच्या सामाजिक बांधिलकीला अधिक बळ देईल. कृषी ज्ञानगंगा अधिक व्यापकपणे वाहण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन निश्चितच रचनात्मक आणि प्रेरणादायी ठरेल. हे निश्चित


महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे २२ वे कुलगुरू म्हणून कार्यभार स्वीकारणाऱ्या डॉ. विलासराव खर्चे यांना त्यांच्या यशस्वी, तेजस्वी आणि दूरदृष्टीपूर्ण कारकिर्दीसाठी मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा.

शब्दांकन— प्राध्यापक अशोकराव ढगे सर

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
75 %
6.6kmh
100 %
Tue
27 °
Wed
30 °
Thu
27 °
Fri
29 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!