spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedस्वर्गीय कॉ. आमदार वकीलराव लंघे पाटील यांचे आदर्श स्मारक उभारावे – डॉ....

स्वर्गीय कॉ. आमदार वकीलराव लंघे पाटील यांचे आदर्श स्मारक उभारावे – डॉ. अशोकराव ढगे

स्वर्गीय कॉ. आमदार वकीलराव लंघे पाटील यांचे पुण्यस्मरणा दिना निमित्त प्रशासनाकडे मागणी


नेवासा

स्वर्गीय कॉम्रेड आमदार वकीलराव लंघे पाटील यांचे आदर्श स्मारक उभे करावे, असे स्पष्ट प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे पाटील यांनी केले. अण्णांचा केवळ पुतळा न उभारता, एक सुबक व छोटे सभागृह असावे. त्या सभागृहात अण्णांचे भव्य तैलचित्र, त्यांच्या आंदोलनातील छायाचित्रे, लिखाण तसेच समाजाभिमुख आणि पुरोगामी विचारांचे दर्शन घडवणारे चित्ररूप कार्य उभे करावे, अशी त्यांनी भूमिका मांडली.


समाजसेवेचे खरे कॉम्रेड वकील अण्णांनी विधानसभेत केलेले लोकहिताचे कार्य, जिल्ह्यात वेळोवेळी उभारलेले संघर्ष, धरणग्रस्तांसाठी केलेला रास्ता रोको आंदोलनाचा इतिहास तसेच महाराष्ट्रात व जिल्ह्यात कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने घेतलेल्या मेळाव्यांचे दर्शन चित्रकथेच्या माध्यमातून स्मारकात असावे, असेही त्यांनी सांगितले.


स्मारकासाठी नेवासा तालुक्यातील शिरसगाव हायस्कूल येथे जागा उपलब्ध करावी. त्या स्मारक भवनात वाचनालयाची व्यवस्था केल्यास स्मारकाची नियमित देखभालही सुकर होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.


अत्यंत मौलिक विचार, ठाम तात्विक भूमिका, पुरोगामी तत्त्वांना शोभणारे कार्य आणि समाजनिष्ठा यासाठी अण्णांनी आयुष्यभर केलेल्या संघर्षावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे. ‘आठवणीतील अण्णा’ या संकल्पनेतून स्मारक उभे राहिल्यास नव्या पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन मिळेल, तसेच आजच्या राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरेल, असे डॉ. ढगे पाटील यांनी नमूद केले.


अण्णांचे स्मारक ‘समाजसेवा ही सत्तेपेक्षा श्रेष्ठ असते’ हा तात्विक विचार समाजापर्यंत पोहोचवेल आणि त्यांच्या संघर्षमय जीवनाची ओळख नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
75 %
6.6kmh
100 %
Tue
27 °
Wed
30 °
Thu
27 °
Fri
29 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!