spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedशेकडो समयांनी उजळला मोहिनीराज मंदिराचा गाभारा

शेकडो समयांनी उजळला मोहिनीराज मंदिराचा गाभारा

गोकर्ण आख्यानाने मोहिनीराज यात्रा सुरू

नेवासा |
नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज महाराज यात्रोत्सवाचे भागवत दीपोत्सवामध्ये विक्रमी समयांनी मोहिनीराज मंदिराचा गाभारा उजळून निघाला आहे.


अर्धनारी नटेश्वर श्रीविष्णूच्या मोहिनी अवताराचे जगातील एकमेव मंदिर नेवासा येथे आहे. हे देवस्थान कुलदैवत म्हणून जगभरातून भाविक माघ पौर्णिमेला होत असलेल्या यात्रेच्या दरम्यान दर्शनासाठी येत असतात.


रथसप्तमीपासून पंधरा दिवस चालत असलेल्या या यात्रा महोत्सवामध्ये सर्वात प्रथम मोहिनीराज देवासमोर भागवत कथा व निरूपण होत असते. या दरम्यान भागवताच्या व्यासपीठापासून देवाच्या मुख्य गाभाऱ्यापर्यंत दुतर्फा आठ दिवस शेकडो समया अखंड तेवत असतात. यावर्षी नवीन दगडी सुंदर कलाकुसर असलेले व्यासपीठ बनवले आहे व यावेळी विक्रमी संख्येने समया लावण्यात आलेले आहेत. परिसरातील प्रत्येक कुटुंबातून एक समय आणून गाभाऱ्यामध्ये ठेवली जाते. भागवत पारायण संपूर्ण होईपर्यंत या समय येणाऱ्या प्रत्येक भाविक पेटत्या ठेवण्याचा उपक्रम करीत असतो व येणाऱ्या प्रत्येक भाविक या समयांमध्ये तेलही घालत असतो.


२५ जानेवारीपासून ७ दिवस, ३१ जानेवारीपर्यंत सदरच्या समया देवाचा गाभारा उजळत राहणार आहेत. या वर्षी साध्वी अनुराधा दीदी पंढरपूरकर यांच्या भागवताचा लाभ नेवासकरांना मिळणार आहे. सकाळी मंदिरामध्ये संहिता वाचन प्रसाद गंधे हे सलग सात वर्षापासून करत आहेत होत असते व दुपारी मंदिरासमोरच्या भव्य मंडपामध्ये भागवत निरूपण होत असते.


यात्रा महोत्सवाचा हा टप्पा संपल्यानंतर पौर्णिमेच्या रात्री मोहिनी माय देवीचा भळंदाचा कार्यक्रम होणार आहे, तर सकाळी सामुदायिक गीतापठण आणि विष्णुसहस्रनामाचे वाचन होणार आहे.

रात्री चंद्रोदय होताच पेटते पलिते व माठाच्या मध्ये असलेल्या पेटते निखाऱ्यासह वडाळा महादेव येथील देवीभक्त श्री आदिनाथ जोशी व सौ. आदिती जोशी हे पारंपरिक भळंद खेळणार आहेत व देवीचा जागर करणार आहेत. रात्री सदरचा कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेकडो भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
75 %
6.6kmh
100 %
Tue
27 °
Wed
30 °
Thu
27 °
Fri
29 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!