spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedनेवासे तालुक्यातील जनतेच्या कुटुंबातीलच एक सदस्य समजून विकास कामे करणार - आमदार...

नेवासे तालुक्यातील जनतेच्या कुटुंबातीलच एक सदस्य समजून विकास कामे करणार – आमदार विठ्ठलराव लंघे

तेलकुडगावात ५९ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भव्य भूमिपूजन!


नेवासा–
– जनतेने दिलेल्या संधीचे सोने करून ग्रामीण भागातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहणार असून त्यादृष्टीने वाटचाल सुरु केलेली असून तालुक्यातील प्रत्येक गावाची मूलभूत समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमी कटीबद्ध राहू असा विस्वास तेलकुडगाव (ता.नेवासे) येथील 59 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भव्य भूमिपूजन आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.


नेवासे तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या हस्ते तेलकुडगाव (ता.नेवासे) येथे ५९ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलच्या अध्यक्षा सौ.सुमतीताई साहेबराव घाडगेपाटील या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर ह.भ.प. अमोल महाराज घाडगे,नेवासे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल,अंकुशराव काळे पाटील, बबनराव पिसोटे,कौठयाचे सरपंच प्रमोद गजभार,सरपंच सतीशराव काळे,काकासाहेब काळे,मधुकर घाडगे,चेअरमन ज्ञानेश्वर काळे,बालकनाथ काळे,मुरलीधर काळे,बाबुराव काळे,अरविंद घाडगे,नामदेव अण्णा घोडेचोर,मच्छिंद्र मुंगसे, पोपटराव सरोदे,संभाजी लोंढे,निलेश कोकरे,संजय घोडेचोर,सोपान शेंडगे,दत्तू काळे आदी मान्यवरसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी बोलतांना आमदार लंघे म्हणाले की, तालुक्यातील जनतेने लंघे – पाटील परिवारावर दाखविलेले प्रेम अन त्या प्रेमाला पात्र राहून विस्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नसून तुमच्याच कुटुंबातील मी एक सदस्य समजून आपण जनतेसाठी नेहमीच काम करत राहू, असा विस्वासही त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.
या भूमिपूजन कार्यक्रमास गावचे सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,महिलामंडळी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

भव्य मिरवाणुकीने स्वागत–

चौकट
तेलकुडगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील आणि त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा सुमतीताई घाडगेपाटील व मान्यवरांची गावातून वाजत गाजत, फटाक्याची आतीश बाजी करून मिरवणूक काढून मोठ्या पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!