spot_img
spot_img
Homeक्रीडाशरीराचे आरोग्य सांभाळायचे असेल तर व्यायाम आणि स्पर्धेत भाग घेणे महत्त्वाचे -...

शरीराचे आरोग्य सांभाळायचे असेल तर व्यायाम आणि स्पर्धेत भाग घेणे महत्त्वाचे – मा आमदार डॉ. नरेंद्र घुले

स्पर्धेचे विजेतेपद रणवीर क्रीडा मंडळ भेंडा या संघाने पटकावले तर त्रिमूर्ती क्रीडा मंडळ नेवासा फाटा हा संघ उपविजयी

नेवासा

“जीवनात निरोगी शरीराला महत्त्व असते. निरोगी शरीर हे खेळातून तयार होते. खेळाडू हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जीवनातील सर्व आव्हानांना सक्षमपणे तोंड देऊ शकतात. म्हणून शरीराचे आरोग्य सांभाळायचे असेल तर त्यामध्ये खेळाला महत्त्वाचे स्थान असले पाहिजे.” असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. नरेंद्रजी घुले पाटील यांनी केले.


प्रा.शशिकांत गाडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

दिनांक 10 मार्च 2026 रोजी जिजामाता महाविद्यालय आणि रणवीर क्रीडा मंडळ, भेंडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अहिल्यानगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या ८५ किलो वजन गटातील मॅटवरील जिल्हा पुरुष संघाची निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन समारंभात बोलत होते. या स्पर्धेचे उद्घाटन जिजामाता महाविद्यालयाच्या इंडोअर स्टेडियममध्ये माजी आमदार डॉ. नरेंद्रजी घुले पाटील यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी प्रा. शशिकांत गाडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, मा. प्रकाश बोरुडे, निवड समिती सदस्य अजय पवार, बाळासाहेब कडूस, प्राचार्य सोपान काळे, फिरोज शेख, अशोकदादा मिसाळ, वैभवराव नवले, शरदराव आरगडे, सुखदेव फुलारी, उपप्राचार्य संभाजी काळे डॉ.काकासाहेब लांडे रवींद्र पाटील, पत्रकार सुखदेव फुलारी, संतोष औताडे, सोपान महापूर, परसराम नाकाडे, बंडू भागवत, पंजाब शिंदे हे उपस्थित होते.

प्रा. डॉ. दत्ता वाकचौरे यांनी प्रास्ताविक केले, तर सोपान महापूर यांनी आभार मानले. पंच म्हणून गीताराम पवार, देविदास अंगरक, विजय जठार ,कार्तिक पोटे, यांनी काम पाहिले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय खेळाडू राहुल खाटीक आणि रघुनाथ मोरकर तसेच रणवीर क्रीडा मंडळ भेंडा यांचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले या स्पर्धेतून नाशिक येथे होणाऱ्या राज्य निवड चाचणी स्पर्धेमधून अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघाची निवड होणार आहे

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!