spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedमुंबईत ‘भक्तीचा महाकुंभ’ उत्सवाला भव्य प्रारंभ; संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना पहिला मान....

मुंबईत ‘भक्तीचा महाकुंभ’ उत्सवाला भव्य प्रारंभ; संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना पहिला मान….

आध्यात्मिक गुरु श्री एम यांच्या पुढाकाराने वरळी मध्ये संत पादुकांचा समावेश असलेला ‘भक्तीचा महाकुंभ”

‘नेवासा-*आशिष कावरे याजकडून**

सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाला आजपासून भव्य प्रारंभ झाला. वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित या ‘भक्तीचा महाकुंभ’ सोहळ्याचे उद्घाटन परमपूज्य स्वामी स्वरूपानंद यांच्या हस्ते पार पडले असून, प्रख्यात आध्यात्मिक गुरु श्री एम यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

या उत्सवासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविकांनी नोंदणी केली असून, भक्तिमय वातावरणात टाळ-मृदंगांच्या गजरात संत आणि सद्‌गुरूंच्या पादुका वरळीत दाखल झाल्या. एकाच छताखाली विविध संतांच्या २१ पादुकांचे दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी भाविकांना उपलब्ध झाली आहे.

सोहळ्यासाठी प्रत्येक पादुकांसाठी आकर्षक मंदिरे उभारण्यात आली असून, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र नेवासा येथील संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुकाही या सोहळ्यात विशेष आकर्षण ठरत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानच्या वतीने या पादुका मोठ्या भक्तिभावाने मुंबईत आणण्यात आल्या. यामध्ये महंत देविदास महाराज म्हस्के विश्वस्त कैलास भाऊ जाधव, सेवेकरी आशिष कावरे आणि दैनिक ‘सकाळ’चे प्रतिनिधी मोहन गायकवाड यांचा सहभाग होता.

भाविकांसाठी विशेष सुविधा :
उत्सवात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून, पूर्वनोंदणी केलेल्या भाविकांसाठी क्यूआर कोड स्कॅनिंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पादत्राणांसाठी स्वतंत्र कक्ष, पिण्याच्या पाण्याची सोय, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी व्हीलचेअर सुविधा, तसेच दर्शनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी गुरुसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘भक्तीचा महाकुंभ’ सध्या भाविकांच्या गर्दीने फुलून गेला असून, आगामी दिवसांतही मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
75 %
6.6kmh
100 %
Tue
27 °
Wed
30 °
Thu
27 °
Fri
29 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!