spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedरहस्यमय कादंबरीच्या लेखिका प्रा. सौ. वसुधा देशपांडे यांच्या 'अनुबंध रहस्यमय शोध'या...

रहस्यमय कादंबरीच्या लेखिका प्रा. सौ. वसुधा देशपांडे यांच्या ‘अनुबंध रहस्यमय शोध’या दुसऱ्या रहस्यमय कादंबरीचे उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री मा. उदयजी सामंत यांच्या हस्ते प्रकाशन….

प्राध्यापक सौ देशपांडे यांच्या पहिल्या ‘कामिनी ‘या कादंबरीस मिळाले आठ राज्यस्तरीय पुरस्कार

नेवासा
रहस्यमय कादंबरीच्या लेखिका प्रा. सौ. वसुधा ज्ञानेश देशपांडे यांच्या ‘अनुबंध रहस्यमय शोध’या रहस्यमय कादंबरीचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री मा. उदयजी सामंतआणि उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, मुंबई चे. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या शुभ हस्ते मंत्रालय मुंबई येथे संपन्न झाले.

आजकालच्या तरुण पिढीला रहस्यमय कथांची जी आवड निर्माण झाली आहे त्याला अनुसरून सौ वसुधा देशपांडे यांनी आपली दुसरी कादंबरी वाचकांसाठी उपलब्ध केली त्याबद्दल त्यांनी प्रा. देशपांडे यांचे मंत्री उदय सामंत यांनी अभिनंदन केले. नवोदित लेखकांनी मराठी साहित्य निर्मितीकडे आपला कल वाढवला पाहिजे हे सांगतानाच महिलांनीसुद्धा निरनिराळ्या विषयावर कादंबरी लेखन करावे असे आवाहन त्यांनी केले.

प्रा. डॉ. ढवळ म्हणाले की लिखाणाचा दर्जा उत्तम असेल तर ते लेखन किंवा ते पुस्तक वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरते. प्रा. देशपांडे यांच्या पहिल्याच कादंबरीस वाचकांची भरघोस दाद मिळाली. यामुळेच त्यांना पुरस्कार प्राप्त झाले. तसेच नवीन अनुबंध रहस्यमय कादंबरी सुद्धा वाचकांच्या पसंतीस उतरो तसेच नवनवीन विषयावर आपले लेखन होवो अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.

सौ वसुधा देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की कामिनी गूढ रहस्य या कादंबरीला वाचकांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि तिला सहा पारितोषिके मिळाली. हीच प्रेरणा घेऊन अनुबंध रहस्यमय शोध या कादंबरीची निर्मिती झाली. कामिनीतील नायिका संजना वर जसे रसिक वाचकांनी मनापासून प्रेम केले तशीच अनुबंध मधील आरतीही वाचकांच्या मनाला नक्की भावेल असा त्यांचा विश्वास आहे.

या प्रकाशन सोहळ्यासाठी बल्लाळ प्रकाशनचे श्री दिलीप बल्लाळ, श्री शार्दुल बल्लाळ, श्री ज्ञानेश देशपांडे ,विकेश मानकर यांनी विशेष हजेरी लावली

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
75 %
6.6kmh
100 %
Tue
27 °
Wed
30 °
Thu
27 °
Fri
29 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!