spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedअखेर घोडेगाव अपर तहसील निर्मितीची अधिसूचना लागू; ८ जुलैपर्यंत हरकती-सूचना मागविण्याची प्रक्रिया...

अखेर घोडेगाव अपर तहसील निर्मितीची अधिसूचना लागू; ८ जुलैपर्यंत हरकती-सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू

आज 23 जूनला अधिसूचना ज्वारी 15 दिवसात सूचना व हरकती नोंदवण्याचे आवाहन


नेवासा/ प्रतिनिधी :
अनेक दिवसापासून अपेक्षित असलेली नेवासा तालुक्यातील महसुली प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड ठरत असलेल्या घोडेगाव अपर तहसील कार्यालयाच्या निर्मितीची अधिसूचना आज दिनांक 23 जून रोजी लागू झाली असून, या प्रस्तावित पुनर्रचनेबाबत संबंधित नागरिक, संस्था व स्थानिकांकडून दि. ८ जुलै २०२६ पर्यंत हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार तसेच जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या पत्रानंतर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, नगर-अहिल्यानगर भाग यांनी ही जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे.


प्रशासकीय कामकाजात सुलभता, महसुली सेवेतील गती आणि नागरिकांना स्थानिक पातळीवर अधिक परिणामकारक सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने घोडेगाव येथे नवीन अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन ठेवण्यात आला आहे. प्राथमिक प्रस्तावानुसार या कार्यालयाचे मुख्यालय घोडेगाव येथे राहणार असून, त्याअंतर्गत चांदा, सोनई, घोडेगाव, वडाळा बहिरोबा आणि देडगाव या मंडळांतील सर्व गावांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे.


प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या प्रस्तावाबाबत हरकती किंवा सूचना असल्यास त्या जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत, म्हणजेच दि. ८ जुलै २०२६ पर्यंत, तहसील कार्यालय नेवासा येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष लेखी स्वरूपात सादर कराव्या लागतील. टपालाद्वारे प्राप्त अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, तसेच मुदतीनंतर आलेल्या हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नाही.


नागरिकांनी हरकती व सूचना स्पष्ट कारणांसह, आवश्यक पुरावे, नकाशे किंवा सांख्यिकीय माहितींसह सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त हरकती व सूचनांचे दैनंदिन संकलन करून त्यावर अभिप्रायासह अहवाल जिल्हाधिकारी अहिल्यानगर व विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्या मार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या अधिसूचनेला व्यापक प्रसिद्धी देण्याच्या सूचना तहसील, पंचायत समिती, ग्रामपंचायती, कृषी विभाग व नगरपंचायत प्रशासनालाही देण्यात आल्या आहेत.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
75 %
6.6kmh
100 %
Tue
27 °
Wed
30 °
Thu
27 °
Fri
29 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!