spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedवस्तुस्थितीवर आधारित प्रश्नांसाठी शेतकऱ्यांचा मार्गदर्शक 'कृषी तरंग'

वस्तुस्थितीवर आधारित प्रश्नांसाठी शेतकऱ्यांचा मार्गदर्शक ‘कृषी तरंग’

नेवासे

वस्तुस्थितीवर आधारित शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांचा वापर करणारे व त्यावर सर्वांगीण उत्तर देणारे ऋषी तरंग या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले अहिल्यानगर येथील जाधव लॉन्स येथे कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक ढगे लिखित पुस्तकाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या शुभहस्ते थाटामाटात संपन्न झाले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेंद्र उदागे होते.

प्रमुख उपस्थिती मध्ये माजी आमदार संभाजीराव फाटके, माजी आमदार पांडुरंग अभंग, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलासराव घरचे, आयुक्त योगेश राव गोडसे, अहिल्यानगर महानगरपालिकेचे कमिशनर डांगे, ज्ञानदेव मामा पांडुळे, सुनील गोसावी, सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते रामराव पाटील भदगले, काशिनाथ अण्णा नवले व्यासपीठावर उपस्थित होते.

पुस्तक प्रकाशन कृषी तरंग यावर सखोल विचारमंथन झाल्यामुळे हा कार्यक्रम एक मोठा वैचारिक परिसंवाद झाला अशा भावना उमटल्या. समारंभाच्या सुरुवातीला दिगंबर गोंधळी यांनी पोवाडा सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कृषी क्षेत्रातील अभ्यासू व अनुभवी अनेक व्यक्ती या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते

सर्वांचे स्वागत डॉ प्रा समीर ढगे यांनी करून सर्व अतिथींचा यथोचित सन्मान करण्यात आला. कृषी तरंग पुस्तकाचे लेखक कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे माजी कुलगुरू यांनी वस्तुस्थितीवर आधारित शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा पुस्तकात उहापोह करून उपाय दिल्याचे आवर्जून सांगितले. विशेषतः शेतकऱ्यांसाठी संरक्षण कायदा परिपूर्ण सर्वांगीण आला पाहिजे असे प्रतिपादित केले.

माजी आमदार संभाजीराव फाटके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्वक विचार मांडले. कुलगुरू डॉक्टर विलासराव खर्चे यांनी शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठात अनेक चांगल्या योजना संदर्भीय माहिती देऊन विद्यार्थ्यांचे कल्याणसाठी चांगल्या उच्च पातळीच्या योजना सुरू केल्या असून संशोधनाला व शिक्षणाला चांगली दिशा देण्याचे कार्य सुरू केल्याचे प्रतिपादित केले.

सध्याच्या प्राप्त स्थितीमध्ये कृषी संशोधन व शेतकऱ्यांचे कष्ट यामुळे भरघोस उत्पादन होत आहे तथापि शेतीच्या मालाला योग्य भाव मिळण्याची आग्रही मागणी माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी मांडली.

आयुक्त डांगे यांनी शेती संदर्भातील विनायक माहिती दिली. याप्रसंगी अनेक वक्त्यांनी अत्यंत विधायक व रचनात्मक विचार मांडून कृषी क्षेत्रात परिवर्तनाची गरज अधोरेखित केली

याप्रसंगी ज्ञानदेव मामा पांडुळे, रामराव पाटील भदगले व भारतीय जनसंसद चे अशोक सब्बन यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना बाजारभावात शास्त्रीय पद्धती व कायद्याचे संरक्षणाबाबत विचार मांडले याप्रसंगी मा जी कलेक्टर किसनराव लवांडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्याचे कार्यवाह कॉम्रेड बाबा आरगडे, मंडल कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके, मृदशास्त्रज्ञ डॉक्टर रामराव सोमवंशी व शेतीचे अभ्यासक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शर्मिला गोसावी यांनी केले तर प्रकल्पाधिकारी कुमारी प्रिया मते यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
26.6 ° C
26.6 °
26.6 °
83 %
3.7kmh
6 %
Sun
26 °
Mon
31 °
Tue
31 °
Wed
28 °
Thu
26 °

Most Popular

error: Content is protected !!