spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedविठ्ठलनामाचा गजराला विधाते बंधूंच्या अभंगवाणीने रंगणार भक्तीचा साज....

विठ्ठलनामाचा गजराला विधाते बंधूंच्या अभंगवाणीने रंगणार भक्तीचा साज….

देवगड संस्थानचे परमभक्त विधाते बंधू; आषाढी एकादशीनिमित्त सलग २९वर्षीही भक्तिरसाचा अविस्मरणीय सोहळा

नेवासा


आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्य मंदिरात शनिवार, २५ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता सुप्रसिद्ध गायक राम विधाते आणि बजरंग विधाते या विधाते बंधूंच्या २९ व्या अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेली सलग २८ वर्षे अभंग, भारूड आणि वारकरी संप्रदायातील भक्तिगीतांच्या माध्यमातून विठ्ठलभक्तांना भक्तिरसात न्हाऊ घालणाऱ्या या जोडीचा यंदाचा कार्यक्रमही विशेष आकर्षण ठरणार आहे.


देवगड संस्थानचे परमभक्त म्हणून ओळख असलेल्या विधाते बंधूंनी आपल्या सुमधुर गायकीने महाराष्ट्रभरातील वारकरी आणि संगीतप्रेमींच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. विठ्ठलभक्ती, संतवाङ्मय आणि अध्यात्माचा संदेश संगीताच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले असून, त्यांची अभंगवाणी ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने रसिकांसाठी पर्वणीच ठरते.


या भक्तिमय सोहळ्यात व्हायोलिनवर डॉ. सुरेश विधाते, बासरीवर निरंजन भालेराव, मृदंगावर ह.भ.प. उद्धव महाराज नवपुते, हार्मोनियमवर प्रा. शंकर विधाते, तर तबला व मंजिरीवर सागर काटे आणि कृष्णा विधाते साथसंगत करणार आहेत. रंगमंच व्यवस्थापनाची जबाबदारी जाधव बंधू (रखमाजी जाधव) सांभाळणार आहेत.


हा कार्यक्रम सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून, शहरातील विठ्ठलप्रेमी भाविक, वारकरी आणि संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभंगवाणीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक बजरंग विधाते आणि विधाते बंधूंनी केले आहे.

आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात विधाते बंधूंच्या सुरेल अभंगांनी तापडिया नाट्य मंदिर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून जाणार असल्याची उत्सुकता रसिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
31.5 ° C
31.5 °
31.5 °
60 %
5.1kmh
86 %
Mon
32 °
Tue
31 °
Wed
27 °
Thu
27 °
Fri
25 °

Most Popular

error: Content is protected !!