spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedमहावितरणकडून नेवासा शहरात स्मार्ट मीटरबाबत जनजागृती....

महावितरणकडून नेवासा शहरात स्मार्ट मीटरबाबत जनजागृती….

शहरांमध्ये जागोजागी फिरून ग्राहकांच्या शंकांचे जागेवर निरसन


नेवासा,—

महावितरणच्या नेवासा उपविभागाच्या वतीने शनिवारी नेवासा शहरात स्मार्ट मीटरबाबत जनजागृती व शंका निरसन अभियान राबविण्यात आले. या उपक्रमातून ग्राहकांना स्मार्ट मीटरचे फायदे समजावून सांगतानाच त्यांच्या मनातील विविध शंकांचे प्रत्यक्ष भेटीगाठीतून निरसन करण्यात आले.


उपकार्यकारी अभियंता राहुल बडवे यांनी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी तसेच मीटर बसविणाऱ्या एजन्सीच्या प्रतिनिधींसह ग्राहकांच्या घरी भेट देऊन स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, त्याचे फायदे आणि वापराची माहिती दिली. ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांना जागेवरच उत्तरे देत गैरसमज दूर करण्यात आले.


यावेळी बोलताना राहुल बडवे यांनी सांगितले की, बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत महावितरणकडून राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट मीटरमुळे ऑटो रीडिंगद्वारे अचूक वीज वापराची नोंद होते. त्यामुळे चुकीचे किंवा सरासरी बिल येण्याची शक्यता राहत नाही. तसेच घरगुती ग्राहकांना दिवसा वापरलेल्या विजेवर दहा टक्के सवलतीचाही लाभ मिळतो. स्मार्ट मीटरच्या मोबाईल ॲपद्वारे ग्राहकांना स्वतःचा वीज वापर पाहता व नियोजन करता येते.


अभियानादरम्यान काही ग्राहकांनी स्मार्ट मीटरमुळे जास्त बिल येत असल्याची शंका व्यक्त केली. त्यावर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सिरीज मीटर लावून तपासणी करून स्मार्ट मीटरची अचूकता दाखवून दिली आणि ग्राहकांचे समाधान केले.


या जनजागृती अभियानात सहाय्यक अभियंता वैभव कानडे, सहाय्यक अभियंता हकीम तसेच महावितरणचे कर्मचारी आणि मीटर बसविणाऱ्या एजन्सीचे प्रतिनिधी सहभागी झाले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
31.5 ° C
31.5 °
31.5 °
60 %
5.1kmh
86 %
Mon
32 °
Tue
31 °
Wed
27 °
Thu
27 °
Fri
25 °

Most Popular

error: Content is protected !!