: ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त काशी विश्वेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने नदीकिनारी असलेल्या सुंदर व रम्य मंदिर परिसरात ४० आंब्यांच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, प्रेस क्लब नेवासाचे अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे, नाना पवार, ज्येष्ठ वकील आप्पा गायके, निवृत्त मुख्याध्यापिका सौ. गायके, विजय कावरे यांच्यासह देवस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
Oplus_0
स्वातंत्र्यदिनानिमित्त मंदिर परिसरातील स्वातंत्र्यवीर स्मारकास मान्यवरांनी हार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष नरसूशेठ लष्करे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मंदिराच्या आवारातील सौंदर्य आणि स्वच्छता पाहून पोलीस निरीक्षक दराडे यांनी विश्वस्त मंडळाचे कौतुक केले
Oplus_0
या कार्यक्रमास काशी विश्वेश्वर देवस्थान अध्यक्ष नरसू शेठ लष्करे सचिव एडवोकेट संजीव शिंदे व मंदिर विश्वस्त श्री इंजिनिअर श्याम डोकडे सचिन पठाडे बाळासाहेब चव्हाण विठ्ठल कुसळकर दत्ता लष्करे जयवंत मापारी महेश मापारीविजय कावरे राजेंद्र वाघ संतोष एरंडे दीपक चिंतामणी सचिन देवरे आदित्य डोंगरे कार्तिक पिटेकर, सचिनशेठ पठाडे, बाळासाहेब चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. नदीकिनारी करण्यात आलेल्या या वृक्षारोपणामुळे देवस्थान परिसराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असून, पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)*
वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत