spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedशेतकऱ्यांच्या कामधेनुला बदनाम करण्याचा कट- प्रवर्तक विजय बापू शिवतारे

शेतकऱ्यांच्या कामधेनुला बदनाम करण्याचा कट- प्रवर्तक विजय बापू शिवतारे


काटा मारी नव्हे तर काट्यात तांत्रिक बिघाड


आंदोलकांमध्ये इतर कारखान्यांचे कर्मचारी सीसीटीव्हीत कैद

नेवासा

वरखेड येथील स्वामी समर्थ कारखाना या परिसरातील शेतकऱ्यांच्या कामधेनुला बदनाम करण्याचा कट कारखान्याचे विरोधक करीत अस याचा आरोप कारखान्याचे प्रवर्तक व माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी केला आहे व कारखान्याच्या आवारात घुसलेल्या आंदोलकांवर कारखाना मानहानीचा दावा दाखल करण्यात असल्याचे देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले

कारखान्याच्या ४ काट्यांची प्रत्येक महिन्यामध्ये वजन माप तपासणी अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते 19 डिसेंबर25 रोजी देखील तपासणी होऊन प्रत्येक वजन काट्याला सील केलेले आहे 14 तारखेला दोन दिवस कारखाना क्लिनिंगसाठी बंद होता काल ४ काट्या पैकी एक वजन काट्यामध्ये वजनामध्ये फरक आला कारण या काट्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला असावा काल वजन माप काटा तपासणी अधिकारी दराडे यांनी सर्व काट्यांची तपासणी केली सर्व काट्यांचे त्यांनी लावलेले सील तसेच आहेत त्यात कोणतीही छेडछाड केलेली नाही याचा अर्थ या काट्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला असून याविषयी काट्याच्या कंपनीला कळवून सदरचा काटा दुरुस्त केला जाईल व तो रिपोर्ट तपासणी अधिकाऱ्यांना दिल्यानंतरच सदरचा काटा सुरू होईल असे शिवतारे यांनी स्पष्ट केली

स्वामी समर्थ साखर कारखाना सुरू होण्याआधी नेवासा तालुक्यातून सुमारे 15 कारखाने ऊस गाळपासाठी नेत होते त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड पिळवणूक होत होती सदरचा कारखाना सुरू होऊ नाही यासाठी विरोधी कारखान्यांनी तीन आणि संबंधित व्यक्तींनी तीन जनहित याचिका टाकले होते हाय कोर्टामध्ये पराभव झाल्यानंतरही सात वर्षांनी सुप्रीम कोर्टामध्ये शिवतारे यांनी केस जिंकून सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून सदरचा कारखाना सुरू केला मागील वर्षी 90 हजार टन गाळप झाले व यावर्षी आत्तापर्यंत सुमारे दोन लाख टन ऊस गाळप झाला आहे

शेतकऱ्यांच्या उसाला चांगला आणि वेळेवर भाव देणाऱ्या भाव देणाऱ्या या कारखान्याच्या विरोधात कोर्ट कचेऱ्या संपल्यानंतर आता बदनामीचे आणि बंद पाडण्याची कारस्थाने ,षडयंत्र सुरू आहेत

मागील महिन्यात गव्हाणी मध्ये लोखंडी अँगल टाकून कारखाना बंद करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु कारखान्याच्या व्यवस्थापनाने कारखाना युद्धपातळीवर दुरुस्त करून पुन्हा चालू केला आता काल झालेला प्रकार हा कारखाना बदनाम करण्याची विरोधकांचे कुभांड असल्याचा आरोप शिवतारे यांनी केला

कारखान्याच्या सीसीटीव्ही मध्ये आलेल्या आंदोलकांमध्ये शेजारच्या कारखान्याचे कर्मचारी देखील दिसत आहेत व आलेल्या कोणत्याही आंदोलकाचे एक टिपरू सुद्धा ऊस या कारखान्यात येत नाही आणि कोणतीही नोटीस न देता कारखान्यां विरोधात आंदोलन करून बदनाम करण्याचा हा प्रयत्न झाला आहे असा देखील आरोप शिवतारे यांनी केला

ही ऊस उत्पादकांची लूट अथवा काटामारी नसून वजन काट्यातील तांत्रिक बिघाड आहे त्यामुळे हा काटा बंद ठेवून कारखाना पुन्हा एकदा सुरळीत चालू आहे असे शिवतारे यांनी स्पष्ट करताना कारखाना परिसरातील शेतकऱ्यांची तक्रार नसल्याचे सांगितले

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
32.2 ° C
32.2 °
32.2 °
43 %
5.9kmh
2 %
Fri
31 °
Sat
40 °
Sun
40 °
Mon
40 °
Tue
37 °

Most Popular

error: Content is protected !!