spot_img
spot_img
Homeजीवन मंत्रपर्यावरण संवर्धन ही आपली सामुहिक जबाबदारी-जलमित्र सुखदेव फुलारी

पर्यावरण संवर्धन ही आपली सामुहिक जबाबदारी-जलमित्र सुखदेव फुलारी

प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातून  सिंगल यूज प्लास्टिकला हद्दपार करावे… आवाहन

नेवासा(प्रतिनिधी):— निर्सगाचे संतुलन आणि  पर्यावरण संवर्धनासाठी जल,जंगल,जमीनी,जन आणि जनावर या पंचसूत्रीची  जपवणूक करण्याची आपली सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन निर्सग मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केले.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता शास्र व कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागच्यावतीने मंगळवार दि.२० जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवका करीता आयोजित जिल्हास्तरीय मूल्य शिक्षण कार्यशाळेत “पर्यावरण संवर्धन काळाची गरज”
या विषयावर मार्गदर्शन करताना श्री.फुलारी बोलत होते. शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रा.डॉ.नारायणराव म्हस्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.


प्रा.संतोष सोनवणे, पत्रकार नामदेव शिंदे, संतोष औताडे, प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, प्रा.डी. बी.देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा विभाग समन्वयक प्रा.डॉ. संजय महेर,कार्यक्रम अधिकारी डॉ.मोहिनी साठे, प्रा.वैभव लाटे,प्रा.डॉ.संजय दरवडे,प्रा.पांडुरंग देशमुख, प्रा.सुलतान अत्तार, प्रा.मीना पोकळे, प्रा.राणी सावंत आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री.फुलारी पुढे म्हणाले की, जन, जल, जंगल, जमीन, जनावर’ ही पंचसूत्री विकासाचा पाया असून या घटकांचे संवर्धन शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे. हे पाचही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत आणि त्यांच्यात समतोल राखणे आवश्यक आहे. या पाच घटकांचे संवर्धन केल्यास शाश्वत विकास साधता येतो आणि नैसर्गिक संसाधनांचे रक्षण होते.

प्लास्टिक हा विघटन न होणारा कचरा आहे आहेत. त्यामुळे प्लास्टिकची विल्हेवाट लावणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. सिंगल यूज प्लॅस्टिक हे आज जलाशय,जमीन प्रदूषणाचे मुख्य कारण बनले आहे. सिंगल-यूज प्लास्टिकमुळे पर्यावरण, वन्यजीव आणि मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात.जल, जमीन, हवा प्रदूषण होते. चारा-पाणी यातून पोटात गेल्याने वन्यजीव पाळीव प्राण्यांचा मृत्यू होतो. त्यांच्या हानिकारक प्रभावामुळे पर्यावरण व निसर्गाचा ऱ्हास होत असल्याने पर्यावरणाच्या रक्षणासाठी  प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातून  सिंगल यूज प्लास्टिकला हद्दपार करा असे आवाहन जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केले

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.नारायणराव म्हस्के म्हणाले, निर्सगाचा प्रत्येक घटक हा अन्न साखळी मधील महत्वाचा घटक आहे. यातील जरी कडी तुटली तर अन्न साखळी तुटेल. जल,जंगल, जमीन व जनावरे या चार घटकांचे रक्षणाची जबाबदारी पाचव्या घटकावर म्हणजे मानवावर आलेली आहे.अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे.

डॉ.शिरीष लांडगे,प्रा.संतोष सोनवणे यांनी ही मनोगत व्यक्त केले.डॉ.संजय महेर यांनी प्रास्ताविक केले.
वेदिका देशमुख व श्वेता तांबे या विद्यार्थिनींनी सुत्रसंचालन केले.
प्रा वैभव लाटे यांनी आभार मानले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
32.2 ° C
32.2 °
32.2 °
43 %
5.9kmh
2 %
Fri
31 °
Sat
40 °
Sun
40 °
Mon
40 °
Tue
37 °

Most Popular

error: Content is protected !!