spot_img
spot_img
Homeजीवन मंत्रवर्ल्ड नॉन-स्टॉप गायन स्पर्धेत जान्हवी शुळची उल्लेखनीय कामगिरी

वर्ल्ड नॉन-स्टॉप गायन स्पर्धेत जान्हवी शुळची उल्लेखनीय कामगिरी

मान्यवरांच्या हस्ते कौतुक आणि सत्कार


नेवासा — अभिनेत्री पुष्पा चौधरी यांच्या आयोजनाखाली पुणे येथे वर्ल्ड नॉन-स्टॉप गायन स्पर्धा उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुका परिसरातील श्री अनिल शुळ यांची कन्या कु. जान्हवी अनिल शुळ हिने सहभाग नोंदवला होता.


या स्पर्धेमध्ये जान्हवीने सादर केलेले गायन अत्यंत सुरेल, भावपूर्ण व प्रभावी ठरले. तिच्या सादरीकरणाने परीक्षकांसह उपस्थित रसिकांची मने जिंकत तिला भरभरून दाद मिळाली. तिच्या या यशामुळे नेवासा तालुक्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.


या यशाच्या पार्श्वभूमीवर नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री संजय लखवाल यांनी पंचायत समिती कार्यालयात जान्हवीचा सन्मानपूर्वक सत्कार केला. यावेळी त्यांनी जान्हवीने गायन क्षेत्रात सातत्य ठेवून पुढील काळात आणखी चांगली प्रगती करावी, अशा शुभेच्छा दिल्या.


तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती व नेवासा तालुक्यातील बचत गटांच्या प्रणेत्या सौ. सुनीताताई शंकरराव गडाख यांनी जान्हवीच्या राहत्या घरी सदिच्छा भेट देत तिचा सत्कार केला. “नेवाशाचे नाव गायन क्षेत्रात असेच उज्वल कर आणि पुढील वाटचालीत मोठे यश मिळव,” असे शुभाशीर्वाद त्यांनी यावेळी दिले.


या प्रसंगी जान्हवीचे कुटुंबीय, मार्गदर्शक व मान्यवर उपस्थित होते. जान्हवीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेवासा तालुक्यातून सदिच्छा व्यक्त होत आहेत.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!