spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedलक्ष्मीआई वरखेडची यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षता घेऊ-आमदार विठ्ठलराव लंघे पाटील

लक्ष्मीआई वरखेडची यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षता घेऊ-आमदार विठ्ठलराव लंघे पाटील

नेवासा(प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील वरखेड येथे दि.७ एप्रिल रोजी होणाऱ्या लक्ष्मी आईच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्याच्या अधिकाऱ्यांच्या समवेत नियोजन बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लक्ष्मी आई वरखेडची यात्रा उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षता घेऊ,भाविकांना सुविधा योग्य पद्धतीने कशा उपलब्ध होतील यासाठी प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा असे आवाहन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी यावेळी बोलतांना केले.


       यावेळी झालेल्या नियोजन बैठकीच्या प्रसंगी तहसीलदार डॉ.संजय बिरादार,गटविकास अधिकारी संजय लखवाल,पोलीस निरीक्षक महेश पाटील,दलित बहुजन चळवळीतील नेते सुधीर वैरागर,देवस्थानचे अध्यक्ष कडूबाळ गोरे पाटील,उपाध्यक्ष लक्षाधीश दाणे


माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम सर्जे,सरपंच विनोद ढोकणे,पोपटराव सरोदे,पोलीस पाटील संतोष घुंगासे,
विजय शिरसाठ यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी, देवस्थानचे सर्व विश्वस्त,ग्रामस्थ गावातील तरुण मंडळाचे पदाधिकारी बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


    यावेळी आलेल्या अधिकारी पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे देवस्थानचे अध्यक्ष कडूबाळ गोरे पाटील यांनी स्वागत केले.तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांनी प्रास्ताविक करतांना प्रशासकीय पातळीवर विविध सुविधा भाविकांना उपलब्ध होण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे सांगितले.यात्रेच्या नियोजन कामी नेवासातालुक्यातील सर्व प्रशासकीय विभाग प्रमुखांना यात्रा काळात सतर्कतेचे आदेश दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

          या नियोजन बैठकीमध्ये बोलतांना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले की दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या  दृष्टीने वरखेड-शिरसगाव हा रस्ता मंजूर केला असून यात्रेकरिता सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आपआपली जबाबदारी व कर्तव्य चोखपणे बजावण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.


      नियोजित बैठकीचे समन्वयक सुधीर नाथा वैरागर म्हणाले की महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या लक्ष्मी आई वरखेड यात्रा या नावाला जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती दिली त्यानुसार  लक्ष्मी आई वरखेड हे नाव पुढील काळात कायम राहीलअसे सांगितले.यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी व यात्रेतील भाविकांना सुविधेची कमतरता भासणार नाही यासाठी प्रशासनासह मंदिर व्यवस्थापनाने प्रयत्न करावा
असे आवाहन केले


           नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी यात्रेच्या परीसराची आपण पोलीस यंत्रणेसह प्रत्यक्ष  पाहणी केली असुन यात्रा काळात अवैध धंदे कारवाई केली जाईल तसेच दादागिरी दहशत खपवुन घेतली जाणार नाही त्यासाठी कडक कारवाई केली जाईल असा ईशारा यावेळी बोलतांना दिला

वरखेड यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी
लक्ष्मीआई मंदिरासह परिसरात एकूण १६ सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले असल्याने मंदिर प्रांगणात गैरप्रकार करणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर — कडूबाळ गोरे पाटील .

यावेळी झालेल्या बैठक प्रसंगी संजय वाल्हेकर, नामदेव चांदणे,सुरेश आढागळे, शंकर भारस्कर,सुनिल वाघमारे,रामभाऊ केंदळे,रामभाऊ कणगरे, सरपंच विनोद ढोकणे आदींची भाषणे झाली. ग्राम विकास अधिकारी डेंगळे  भाऊसाहेब यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!