spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedघोडेगावच्या अप्पर तहसिलदार पदी सोनाली मात्रे.. घोडेगाव परिसरात जल्लोष

घोडेगावच्या अप्पर तहसिलदार पदी सोनाली मात्रे.. घोडेगाव परिसरात जल्लोष

घोडेगाव तालुका निर्मिती साठीचे प्रशासकीय कामकाजाचे एक पाऊल पुढे

घोडेगाव दिलीप शिंदे यांजकडून

नेवासा नगरपंचायतीच्या कधीतरी अधिकारी म्हणून काम केलेल्या सौ सोनल मात्रे यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाल्यानंतर त्यांना परिशिकाधीर उपजिल्हाधिकारी म्हणून घोडेगाव अप्पर तहसीलदार म्हणून पहिलीच नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणून

नेवासा नगरपंचायतीच्या कधीतरी अधिकारी म्हणून काम केलेल्या सौ सोनल मात्रे यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाल्यानंतर त्यांना परिशिकाधीर उपजिल्हाधिकारी म्हणून घोडेगाव अप्पर तहसीलदार म्हणून पहिलीच नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणून


परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी श्रीमती सोनाली मात्रे यांची घोडेगाव येथील अप्पर तहसिलदारपदी नियुक्ती झाली असून त्या घोडेगावच्या प्रथम अप्पर तहसिलदार ठरल्या आहेत. या नियुक्तीमुळे नव्या तालुका निर्मितीच्या प्रक्रियेला गती मिळणार असून प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.


सामाजिक कार्यकर्ते सुधीर वैरागर यांनी स्वतंत्र तहसिल कार्यालयासाठी तब्बल तेरा वर्षे एकाकी लढा दिला होता. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले असून सोनाली मात्रे यांच्या नियुक्तीमुळे स्थानिकांच्या मागणीला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.


अप्पर तहसिलदार श्रीमती सोनाली मात्रे यांची १० एप्रिल २०२६ ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत नियुक्ती असून त्यांच्या कार्यक्षेत्रात घोडेगाव, चांदा, सोनई, वडाळा, बा. देडगाव या पाच मंडळांतील सुमारे ५० गावांचा समावेश आहे. असा आदेश जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिला आहे.


घोडेगाव येथे अप्पर तहसिलदार पदाची नियुक्ती झाल्याने महसुली कामकाजाला वेग येणार असून प्रस्तावित नवीन तालुक्याच्या प्रशासनासाठी भक्कम पायाभरणी होत असल्याची अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!