spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedघटनापती प्रतिष्ठान’च्या आयोजित अभिवादन कार्यक्रमाला सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद....

घटनापती प्रतिष्ठान’च्या आयोजित अभिवादन कार्यक्रमाला सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….

नेवासा (वार्ताहर) : नेवासा शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३८ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. आम आदमी पार्टीचे नेते संजय सुखदान यांच्या ‘घटनापती प्रतिष्ठान’च्या वतीने शहरातील मुख्य बाजारपेठेत संपूर्ण निळ्या रंगाच्या भव्य कमानी उभारण्यात आल्या होत्या. या कमानींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने संपूर्ण नेवासा शहर निळ्या प्रकाशात न्हाऊन निघाला होता.


बसस्थानकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य 50 फूट उंचीची प्रतिमा मंच उभारण्यात आला होता. सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे घटनापती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सुखदान, नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष सौ. शालिनी सुखदान, प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे, सी 24 तासचे शंकर नाबदे, ज्येष्ठ व्यापारी जयकुमार गुगळे तसेच शिक्षक बँक नेवासा शाखेचे मॅनेजर दत्तात्रेय चिंधे, योगेश रासने, जयदीप जामदार यांच्या हस्ते प्रतिमेला निळा टिळा लावून, मेणबत्ती प्रज्वलित करून व पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.


दिवसभर तालुक्यातील विविध मान्यवरांनी भेट देत अभिवादन केले. यामध्ये माजी मंत्री शंकरराव गडाख, नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, भाजपाचे मनोज पारखे, सर्व नगरसेवक नगरसेवक, प्रेस क्लब सर्व सदस्य, रिक्षा संघटना तसेच पोलीस कर्मचारी, तसेच महसूल व नगरपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. युवकांनी स्वयंसेवक म्हणून उत्कृष्ट नियोजन करत शिस्तबद्ध कार्यक्रम पार पाडला.

चौकट –
आज १५ एप्रिल रोजी नेवासा शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित जिवंत देखावा हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरणार असून, शहरात उत्साहाचे वातावरण अधिकच रंगणार आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
75 %
6.6kmh
100 %
Tue
27 °
Wed
30 °
Thu
27 °
Fri
29 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!