spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedग्रामीण भागातील कलावंताला मिळाला राज्यस्तरीय सन्मान!मक्तापूरचे चित्रकार अजित साळवे यांचा ‘आदर्श चित्रकार’

ग्रामीण भागातील कलावंताला मिळाला राज्यस्तरीय सन्मान!मक्तापूरचे चित्रकार अजित साळवे यांचा ‘आदर्श चित्रकार’


नेवासा (प्रतिनिधी)

: ग्रामीण भागातील कलावंतांना प्रोत्साहन देणारी अभिमानास्पद घटना म्हणजे मक्तापूर येथील सुप्रसिद्ध चित्रकार अजित साळवे यांना छत्रपती संभाजीनगर येथील साहित्यधार बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने ‘आदर्श चित्रकार’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या या यशामुळे नेवासा तालुक्यासह मक्तापूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आह


ग्रामीण भागातून पुढे येत आपल्या कलेच्या जोरावर राज्यस्तरावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अजित साळवे यांच्या सन्मानार्थ त्यांच्या निवासस्थानी नुकताच स्नेहसोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध मान्यवरांनी त्यांच्या कलाप्रवासाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातुरे सर यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, अजित साळवे यांच्यासारखा समर्पित कलाकार नेवासा तालुक्याला लाभणे ही अभिमानाची बाब असून, त्यांच्या चित्रकलेतून समाजप्रबोधनाचे कार्य घडत आहे.


मुकिंदपूरचे पोलीस पाटील आदेश साठे यांनी साळवे यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक करताना कमळाच्या फुलाचे उदाहरण दिले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी कला क्षेत्रात मिळवलेले यश प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. मक्तापूरचे माजी सरपंच पुनमचंद साळवे यांनी हा सन्मान संपूर्ण गावासाठी भूषणावह असल्याचे सांगितले.


माजी उपसरपंच देवदाण साळवे यांनी ग्रामीण भागातील कलाकाराने राज्यस्तरावर पोहोचणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे नमूद केले. मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी आपल्या मनोगतात, अजित साळवे यांनी आपल्या चित्रकलेच्या जोरावर मक्तापूरसारख्या खेड्याचे नाव महाराष्ट्रभर पोहोचवले असल्याचे सांगितले. प्रदीप साळवे यांनी त्यांच्या कलागुणांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


अजित साळवे यांचे बालमित्र रामचंद्र बर्डे यांनी त्यांच्या संघर्षमय प्रवासाला उजाळा देताना, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले असल्याचे सांगितले.


या कार्यक्रमास बाळासाहेब केदारे, भास्कर मामा लिहिणार, प्रा. आल्हाट सर, योहान साळवे, शैलेश साळवे, विजय साळवे, अविनाश साळवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी साळवे यांच्या उत्कृष्ट कलाकृतींचे कौतुक करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!