spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedअबब!घोडेगावच्या बाजारात ‘राजस्थानी कोटा’ बोकडाची धूम; तब्बल १ लाख ११ हजारांत विक्री...

अबब!घोडेगावच्या बाजारात ‘राजस्थानी कोटा’ बोकडाची धूम; तब्बल १ लाख ११ हजारांत विक्री…

घोडेगाव बाजारात ७५० बोकडांची आवक; सव्वा कोटींची उलाढाल


घोडेगाव दिलीप राव शिंदे याज कडून ब

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी घोडेगाव येथील शेळी-बकरी बाजारात एक अनोखी आणि लक्षवेधी घटना घडली. पांगरमल येथील शेतकरी गणेश आव्हाड यांनी विक्रीसाठी आणलेल्या राजस्थानी कोटा जातीच्या देखण्या बोकडाला तब्बल १ लाख ११ हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाल्याने संपूर्ण बाजारात एकच चर्चा रंगली.


सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेला बाजार दुपारी साडेबारा वाजेपर्यंत गजबजलेला होता. बकरी ईद अवघ्या काही दिवसांवर आल्याने घोडेगाव बाजारात बोकडांची मोठी आवक झाली होती. छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, नाशिक, कल्याण, ठाणे तसेच सांगली जिल्ह्यातील व्यापारी आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी दाखल झाले होते.


तोतापुरी, संगमनेरी, बिटल, गावरान तसेच राजस्थानी कोटा जातीचे विविध बोकड बाजारात आणण्यात आले होते. मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते गणेश आव्हाड यांच्या राजस्थानी कोटा जातीच्या बोकडाने. साधारण १२० ते १२५ किलो वजनाचा हा बोकड अंगावर आकर्षक झुल, शिंगांना गोंडे आणि पायात घुंगरू बांधून सजवण्यात आला होता. कपाळावर चंद्रकोरीसारखा पांढरा ठिपका असल्याने त्याचे वेगळेपण अधिक उठून दिसत होते.


या देखण्या बोकडाला सुरुवातीपासूनच खरेदीदारांची मोठी पसंती मिळत होती. अखेर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील आदिलभाई खाटिक यांनी तब्बल १ लाख ११ हजार रुपये मोजून हा बोकड खरेदी केला. व्यवहार पूर्ण होताच बाजारात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. व्यापारी कल्याण ईखे, संतोष ईखे, शिवाजी ईखे, भाऊराव ठोंबरे, अमोल खाटेकर, रमेश जाधव, आप्पा जाधव, खोसपुरीचे सरपंच कय्युमभाई शेख आणि तिसगावचे फिरोज शेख यांनी आदिलभाई खाटिक यांचा फेटा बांधून सत्कार केला.


“घोडेगाव बाजार म्हणजे विश्वास”
“घोडेगावचा बकरा बाजार राज्यभर प्रसिद्ध आहे. येथे रास्त दरात दर्जेदार आणि विविध जातींचे बोकड मिळतात. विशेषतः बकरी ईदसाठी लागणाऱ्या बोकडांची मोठी व्हरायटी येथे असल्याने आम्ही दरवर्षी इस्लामपूरहून खरेदीसाठी येतो,” असे आदिलभाई खाटिक यांनी सांगितले.


७५० बोकडांची आवक; सव्वा कोटींची उलाढाल
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपआवारात शुक्रवारी सुमारे ७५० बोकडांची आवक झाली. त्यापैकी ६२० बोकडांची विक्री झाली असून बाजारात सुमारे सव्वा कोटी रुपयांची उलाढाल झाली. तसेच ११ हजार रुपयांची बाजार फी वसूल झाल्याची माहिती सचिव देवदत्त पालवे आणि शाखा व्यवस्थापक संभाजी पवार यांनी दिली.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.5 ° C
26.5 °
26.5 °
77 %
5.5kmh
100 %
Wed
27 °
Thu
30 °
Fri
30 °
Sat
31 °
Sun
31 °

Most Popular

error: Content is protected !!