spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedधामोरी येथे अद्ययावत व्यायाम शाळेचे लोकार्पण; तरुणाईत उत्साहाचे वातावरण...

धामोरी येथे अद्ययावत व्यायाम शाळेचे लोकार्पण; तरुणाईत उत्साहाचे वातावरण…

ग्रामीण भागातील तरुणां च्या करिअरला दिशा मिळणारी व्यायाम शाळा —आदिनाथ पठारे


नेवासा (प्रतिनिधी) : दि. ४ जून रोजी नेवासा तालुक्यातील मौजे धामोरी येथे तरुणांच्या दीर्घकाळाच्या मागणीला प्रतिसाद देत आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सुसज्ज व अद्ययावत व्यायाम शाळेचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. या व्यायाम शाळेचा लोकार्पण सोहळा ग्रामस्थ, युवा वर्ग व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


ग्रामीण भागातील तरुणांना पोलीस भरती, सैन्य भरती तसेच विविध शारीरिक स्पर्धांमध्ये पुढे जाण्याची मोठी आवड असल्याने या जिममुळे त्यांच्या प्रशिक्षणाला नवी दिशा मिळणार आहे. आधुनिक उपकरणांनी सज्ज झालेली ही व्यायामशाळा गावातील युवकांसाठी आरोग्य, शिस्त आणि करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी बोलताना आदिनाथ पटारे यांनी नमूद केले.


धामोरी गावातील ज्येष्ठ भजनी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानदेव रामचंद्र पटारे यांच्या शुभहस्ते नारळ फोडून या व्यायाम शाळेचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्साह लक्षणीय होता.


या प्रसंगी बहिरवाडी सोसायटीचे चेअरमन नवनाथ पाटील पटारे, तसेच युवा कार्यकर्ते आदिनाथ पटारे , बहिरवाडी सोसायटीचे चेअरमन नवनाथ पाटील पटारे, जगन्नाथ महाराज पटारे,युवा नेतृत्व राम पटारे,रमेश ठोकळ,संदीप पटारे,अविनाश दाणे ,सोमनाथ ठोकळ,सागर दाणे,युवराज गायकवाड,महेश आडगळे, अनिल आढागळे, माधव पटारे, अश्विन पटारे,शुभम पटारे,ओम घोरपडे,भारत पटारे,विठ्ठल दाणे,आदी ग्रामस्थ व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

. कार्यक्रमात उपस्थित सर्व ग्रामस्थ व युवकांनी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे गावासाठी व्यायाम साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.


या उपक्रमामुळे धामोरी गावात आरोग्यदायी जीवनशैली आणि युवा विकासाला नवी चालना मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!