spot_img
spot_img
Homeक्राइमतुकाराम मुंडे यांच्याअन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी, नेवासा शहरात कारवाई; आईस्क्रीम व खाद्यतेलाचा...

तुकाराम मुंडे यांच्याअन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी, नेवासा शहरात कारवाई; आईस्क्रीम व खाद्यतेलाचा साठा जप्त

संशयित आईस्क्रीम भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त


नेवासा (प्रतिनिधी) :

जिल्ह्यात सुरू असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत राहुरी व नेवासा येथे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून संशयित आईस्क्रीम व खाद्यतेलाचा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण २ लाख ८४ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अ. अ. भोईटे यांनी केले आहे.

नेवासा शहरातील कडू गल्ली येथील संतोष किराणा स्टोअर्सची तपासणी करून एसबीजी ब्रँडच्या रिफाइंड पामोलीन ऑईलचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. साठा संशयास्पद आढळल्याने २ लाख ४२ हजार ७४० रुपये किमतीचे १ हजार ४९८.४ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले.


अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार व सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच नियम २०११ अंतर्गत ही मोहीम राबविण्यात येत आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, उ. र. पाटील व सहाय्यक आयुक्त अ. अ. भोईटे यांनी ही कारवाई केली

.
जिल्ह्यात नागरिकांना स्वच्छ व भेसळमुक्त अन्न उपलब्ध व्हावे यासाठी ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात सुरू असून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!