spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedपोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना पोलीस उप अधीक्षक पदी पदोन्नती

पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना पोलीस उप अधीक्षक पदी पदोन्नती

नेवासा

गिरिम, ता. दौंड जि. पुणे येथील मुळ रहिवासी असलेले व सध्या अहिल्यानगर येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना राज्य सरकारने पोलीस उप अधीक्षक पदी पदोन्नती दिली आहे.


आज राज्य सरकारने राज्यातील 224 पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक ते पोलीस उप अधीक्षक पदी पदोन्नती दिली आहे. सेवा कालावधी व सेवा अभिलेख पडताळणी आणी छाननी करून पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्य शासनाकडे अहवाल पाठवला होता. कर्मठ शिस्तीचे म्हणुन परिचित असलेले वरीष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचा देखील या आदेशात समावेश आहे. राज्य शासनाने पदोन्नतीने त्यांची धानोरा, जि. गडचिरोली या नव्या ठिकाणी नेमणूक केली आहे.

धनंजय जाधव हे सन 1993 साली सरळ सेवा भरतीने पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस खात्यामध्ये आले होते. त्यांची एकूण 32 वर्ष सेवा झाली असुन त्यांना सेवा कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करिता जवळपास 200 पेक्षा जास्त बक्षिसे मिळाली आहेत. जाधव यांना शासनाने ऑगस्ट 2023 देखील पदोन्नती देऊ केली होती परंतु वैयक्तिक कारणास्तव त्यांनी ती नाकारली होती.


धनंजय जाधव यांनी 1994 साली प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, पुणे शहर, सोलापूर ग्रामीण, कोल्हापूर व राहुरी तालुका ,नेवासा तालुका, अहिल्यानगर या ठिकाणी सक्षमपणे कर्तव्य पार पाडले आहे. धनंजय जाधव ऑगस्ट 2029 अखेर सेवा निवृत्त होणार आहेत.

पदोन्नती मिळाल्याने जाधव यांनी आनंद व्यक्त केला असून जनतेची आणखी चांगली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली असल्याने शासनाचे आभार मानले आहेत. नेवासा प्रेस क्लब तर्फे त्यांचे अभिनंदन केले आहे

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
75 %
6.6kmh
100 %
Tue
27 °
Wed
30 °
Thu
27 °
Fri
29 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!