नेवासा पोलिसांचा पालखी सोहळ्यात भक्तीसोबत समाजप्रबोधनाचा जागर;
नेवासा (प्रतिनिधी) : नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेली ‘नेवासा पोलीस ठाणे अमली पदार्थ विरोधात जनजागृती मोहीम–२०२६’ ही विशेष जनजागृती दिंडी पालखी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरली. प्रसिद्ध चित्रकार भरतकुमार उदावंत, सत्यजित उदावंत यांनी व्यंगचित्रे आणि आकर्षक संदेशफलकांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रभावी जागर घडवून आणला.
“व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार”, “दारूमुक्त समाज, सुदृढ परिवार”, “व्यसन सोडा, जीवन घडवा”, “रामकृष्ण म्हणा, नको आता तंबाखू-चुना” तसेच “ज्ञानेश्वरी वाचा गाथा, व्यसनापुढे नका टेकवू माथा” अशा आशयाचे शेकडो संदेश असलेले फलक हातात घेऊन वारकरी, महिला, युवक आणि नागरिकांनी व्यसनमुक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. नामस्मरणाबरोबरच सामाजिक प्रबोधनाचा हा अनोखा उपक्रम उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होता.

या अभियानात आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील, सौ. रत्नमाला लंघे-पाटील, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के, ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक, ह.भ.प. साधना मुळे व कुलस्वामिनी महिला मंडळ, अंकुश महाराज जगताप, नगराध्यक्ष डॉ. करण घुले, नगरसेवक मस्के, बहिरट महाराज, आदिनाथ पटारे, गणेश गव्हाणे, बाबा वाघमोडे, आप्पा होन, प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे, सुहास पठाडे, अशोक डहाळे, कैलास शिंदे, पवन गरुड, मोहन गायकवाड, निखिल शिंगवी, उमेश ठाणगे, मनोज हापसे, संतोष चांदणे, अल्ताफ पठाण अगर व्यवस्थापक प्रशांत होले एसटी कर्मचारी गणेश फुलकर
सुरज पोटे नंदू बोरुडे विकास सातपुते कैलास मस्के अनिल जरे मुकेश गोयल सतीश पवार सुनील वालतुरे अक्षय वडागळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, महाराज मंडळी, पत्रकार आणि नागरिकांनी व्यसनमुक्तीचे फलक हातात घेऊन जनजागृतीत सहभाग नोंदविला.

आध्यात्मिक वातावरणात पोलीस प्रशासनाने सामाजिक जबाबदारी जपत राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी व्यसनमुक्तीचे फलक हातात घेऊन अभियानाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.

भक्तीच्या पवित्र वातावरणात व्यंगचित्रे, घोषवाक्ये आणि संदेशफलकांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा जागर घडवून आणणारा हा उपक्रम पालखी सोहळ्यातील सर्वाधिक चर्चेचा आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला असून, तरुण पिढीपर्यंत व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश पोहोचविण्यात नेवासा पोलीस ठाण्याला मोठे यश मिळाल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

