spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedवारकऱ्यांच्या सेवेत कृषीदूत; भानसहिवरे महाविद्यालयाचा आदर्श उपक्रम

वारकऱ्यांच्या सेवेत कृषीदूत; भानसहिवरे महाविद्यालयाचा आदर्श उपक्रम

नेवासा

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या कृषी महाविद्यालय, भानसहिवरे येथील कृषीदूतांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, अल्पोपहार तसेच प्रवासादरम्यान आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली.


महाविद्यालयाचे कृषीदूत पंकज बर्डे, ओंकार भाकरे, ऋषिकेश भांगे, प्रणोत नवले आणि युवराज राजपूत यांनी सेवाकार्यात सक्रिय सहभाग नोंदविला. कृषी सहाय्यक कांचन गरड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.


सेवेदरम्यान विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची आस्थेने विचारपूस करत त्यांना आवश्यक सुविधा पुरवल्या. विद्यार्थ्यांच्या सेवाभावी वृत्तीचे वारकऱ्यांनी मनापासून कौतुक केले आणि त्यांना शुभाशीर्वाद दिले.
वारकरी परंपरेचा सन्मान राखत समाजसेवेची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, या उद्देशाने महाविद्यालयाकडून हा उपक्रम राबविण्यात आला. या सेवाकार्यात विद्यार्थी, प्राध्यापक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग होता

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.5 ° C
29.5 °
29.5 °
72 %
4.2kmh
99 %
Mon
30 °
Tue
31 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
25 °

Most Popular

error: Content is protected !!