spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedनेवासा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पटारे यांची फेरनिवड....

नेवासा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब पटारे यांची फेरनिवड….


नेवासा (प्रतिनिधी): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियान अंतर्गत नेवासा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ काँग्रेस नेते अण्णासाहेब पटारे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी १७ जुलै रोजी नियुक्तीपत्र प्रसिद्ध केले.


संघटन सृजन अभियानांतर्गत प्रदेश काँग्रेसच्या निरीक्षकांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांना भेटी देत पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर सर्वानुमते अण्णासाहेब पटारे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.


अण्णासाहेब पटारे हे नेवासा तालुक्यातील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते असून ते नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच सुरेगाव-गंगा ग्रामपंचायतीचे अनेक वर्ष सरपंच म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाची धुराही त्यांनी यापूर्वी यशस्वीपणे सांभाळली आहे.


निवडीनंतर बोलताना पटारे यांनी तालुक्यात काँग्रेसचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी गावोगावी शाखा स्थापन करणे, बूथ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण करणे आणि बीएलए-२ नियुक्ती प्रक्रियेला गती देण्यावर भर दिला जाईल, असे सांगितले.


अण्णासाहेब पटारे यांच्या फेरनिवडीबद्दल माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, दक्षिण जिल्हाध्यक्ष किरण पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अभिजित लुणिया यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
31.5 ° C
31.5 °
31.5 °
60 %
5.1kmh
86 %
Mon
32 °
Tue
31 °
Wed
27 °
Thu
27 °
Fri
25 °

Most Popular

error: Content is protected !!