नेवासा : लोकनेते मारुतरावजी घुले पाटील संत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी सचिव, माजी संचालक तसेच कृषीतज्ज्ञ आदरणीय काकासाहेब आबासाहेब शिंदे पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने नेवासा तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.
काकासाहेब शिंदे पाटील यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा मोठा परिवार आहे. अॅड. बाळासाहेब शिंदे, इंजिनिअर भास्करराव शिंदे आणि डॉ. शंकरराव शिंदे यांचे ते वडील बंधू होत.
कृषी क्षेत्रासह सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या मूळ गावी सुरेगाव येथे नदीकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार पांडुरंग अभंग, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्यासह तालुक्यातील राजकीय, सामाजिक, सहकार व विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

