spot_img
spot_img
Homeप्रशासनUncategorizedराजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती भानसहिवरे शाळेत उत्साहात

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती भानसहिवरे शाळेत उत्साहात


नेवासा

भानस हिवरा ता. नेवासा जि. अहिल्यानगर शाळेमध्ये स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा पंचायत समितीचे उपासभापती किशोर जोजार हे होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले
प्रतिमापूजन करण्यात आले


शाळेचे मुख्याध्यापक राजेश जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. व राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर सखोल माहिती दिली
यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना उपासभापती किशोरभाऊ जोजार यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचारित्रावर मार्गदर्शन केले व स्वामी विवेकानंद यांचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा व आपल्या जीवनात प्रगती करावी गावाचे,शाळेचे नाव उज्वल करावे असे सांगितले.

शाळेला भौतिक सुविधासाठी पाहिजे ती मदत करू,मुख्याध्यापक
राजेश जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक अतिशय मेहनत घेत असून विध्यार्थ्याची गुणवंत्ता अतिशय चांगली असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार जाधव, सोसायटीचे संचालक सुभाष मकासरे,बापू जाधव उपस्थित होते.


यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली., जानवी टाके हिने जिजाऊच्या कार्यावर भाषण केले. ओम पवार याने छान असा पोवाडा गायला. उपसभापती किशोर भाऊ जोजार यांच्या वतीने विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली.



राजेंद्र पाचे,श्रीधर साळुंके, आशा गवळी, सुमन सोळसे, महेश देवतरसे, वर्षाताई कुऱ्हाडे उपस्थितहोते सूत्रसंचालन अशोक ढोले यांनी केले.आभार दत्तात्रय चोथे यांनी मानले
.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
32.2 ° C
32.2 °
32.2 °
43 %
5.9kmh
2 %
Fri
31 °
Sat
40 °
Sun
40 °
Mon
40 °
Tue
37 °

Most Popular

error: Content is protected !!