spot_img
spot_img
Homeक्राइमचांदा येथे गोळीबार तरुणाचा जागीच मृत्यू

चांदा येथे गोळीबार तरुणाचा जागीच मृत्यू

गावठी कट्ट्याचा वापर झाल्याचा संशय

नेवासा
चांदा गावातील सहा नंबर चारी जवळ असलेल्या चांद पीर बाबा इनामी जमिनीत कंदुरी जेवणाच्या कार्यक्रमात झालेल्या वादातून मित्रानेच मित्रावर गोळीबार केल्याची घटना आज, रविवारी सायंकाळी घडली. यामध्ये शाहिद राजू शेख (कोतवाल, वय २४) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर उपस्थित तरुण शास्त्रासह पसार झाले.

शाहिद शेख याच्या छातीत गोळी लागल्याने तो जागीच ठार झाला. वादाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शाहिद शेख हा बकऱ्यांचा खरेदी विक्री करणारा व्यापारी होता. घटना घडल्यानंतर काही वेळातच शिंगणापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शाहिद शेख याच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले.

या घटनेने नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यात मध्ये दोन टोळ्यांमध्ये भांडण झाली. त्यामध्येही गावठी कट्ट्याचा वापर झाल्याची चर्चा आहे.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.online/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
light rain
29.6 ° C
29.6 °
29.6 °
70 %
6.1kmh
88 %
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!